नांदेड| पावसाळ्यातील आजार आणि आरोग्याची काळजी याविषयी, नांदेड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. शिवशक्ती पवार यांची मिलिंद व्यवहारे यांनी घेतलेली मुलाखत आज सोमवार दिनांक 25 जुलै रोजी सकाळी दहा वाजता नांदेड आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणार आहे.
पावसाळ्यातील जलजन्य आजार व उपाययोजना, पाणी तपासणी, हाताळणी व जल शुद्धीकरण, घरच्या घरी ओआरएस तयार करण्याची पध्दत आणि आरोग्याची घ्यावयाची काळजी याविषयी डॉ. शिवशक्ती पवार यांनी मुलाखतीमधून माहिती दिली आहे. तरी सर्व नागरिकांनी ही मुलाखत ऐकावी असे आवाहन नांदेड आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी विश्वास वाघमारे यांनी केले आहे.