मुखेड, रणजित जामखेडकर| युवासेनेच्या मुखेड तालुका आढावा बैठकीत रयत क्रांती संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष, युवा नेतृत्व बालाजी पाटील ढोसणे व पप्पु पाटील जाधव यांनी केला शेकडो समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे तालुक्यात शिवसेनेला बळकटी मिळण्याची शक्यता वाढली आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिक विमा , बँक पिक कर्ज, दुष्काळ अनुदान व अतिवृष्टी नुकसानीच्या प्रश्नांची शासन दरबारी आवाज बनुन शेतकर्यांसाठी न्याय मिळवून देत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी अहोरात्र झगडणारे तालुक्यातील लढवय्ये, युवा नेतृत्व, शेतकरी पुत्र बालाजी पा. ढोसणे यांच्या शिवसेना प्रवेशाने शिवसेनेला एक लढवय्या नेता मिळाला आहे . मुखेड येथील शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झालेल्या युवासेनेचे आढावा बैठकीस शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी पा. शिंदे नागणीकर यांच्या प्रमुख उपस्थिती बालाजी पाटील ढोसणे यांनी आपल्या शेकडो समर्थक कार्यकर्त्यांसह प्रवेश केला.
यावेळी शिवसेना जिल्हा संघटक शंकर पा. लुटे, ऊपजिल्हा प्रमुख भालचंद्र नाईक,तालुकाप्रमुख नागनाथ लोखंडे,शहरप्रमुख शंकर चिंतमवाड, तालुका संघटक शंकर पिटलेवाड, शहर संघटक गजु लंगेवाड,युवासेनेचे पवण पोतदार,कृष्णा कामजे,माधव देवकत्ते,मन्मथ खंकरे,अतुल सुनेवाड,विष्णु निमलवाड,ऊमेश सिध्देश्वरे,ऊमेश जाधव,शहर समन्वयक कैलास राहेरकर,संतोष घाळेवाड,संदानंद घाळे,काशीनाथ श्रिरामे,विभागप्रमुख संजय पा.लादगेकर,जयराम कानगुले, योगेश कामघंटे योगेश मामीलवाड, चंद्रकांत गुलमेवाड,बालाजी मामीलवाड, संग्राम कुमठे, सुनील गव्हाणे,संजय पाटील,व्यकंट कांबळे कबनुरकर,मारोती जाधव वसुरकर,सर्जेराव राठोड, बळीराम राठोड, आनंद वाघमारे,पंढरी नोमुलवाड,दिपक खंडगावे,योगेश मरकंटवाड,आनंद लोखंडे,राजु बोईनवाड यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थितीत होते. बालाजी ढोसणे यांच्या शिवसेना प्रवेशाने येणार्या काळात शिवसेनेला नक्कीच फायदा होणार असल्याचे तालुक्यातील राजकीय विश्लेषकांतुन बोलल्या जात आहे.