रस्त्यासाठी गावकऱ्यांना मागील २० वर्षांपासून पराकोटीचा संघर्ष
शिवणी, प्रकाश कार्लेवाड। एकीकडे स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त देशात आजादी का अमृत महोत्सव च्या तयारी जल्लोषात आहेत.तर दुसरीकडे नेते मात्र मोठे पण विकास मात्र खोटे,असे म्हणण्याची वेळ किनवट तालुक्यातील मलकजाम येथील ग्रामस्थांवर आली आहे.रस्त्या अभावी मागील २० वर्षांपासून मलकजाम तांडा ते मलकजाम गाव हा तीन किलोमीटरवर चा रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे गाव गावकऱ्यांना गाव सोडायची वेळ आली आहे.तर येथील काही नागरिकांनी गाव सोडून तेलंगणा राज्यात स्थलांतर झाल्याची माहिती ही समोर येत आहे.येथील लोकप्रतिनिधींनी निवडणुकीच्या वेळी जनतेला रस्त्याचे काम करून देतो म्हणून अनेक वेळा आश्वासन दिल्या.पण मागील वीस वर्षांपासून या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या मलकजाम येथील ग्रामस्थांना रस्ता खराब झाल्याने नरक यातना सहन कराव्या लागत आहे.
मागील काही दिवसांपासून शिवणी परिसरात प्रचंड पाऊस झाल्याने येथील रस्त्यावर खड्डेच खड्डे झाल्याने सध्या स्थितीत रस्ता खरडून गेला आहे.रस्त्यावरील डांबर गिट्टी वाहून गेल्याने नेमका हा रस्ता गेला कुठे असा प्रश्न येथील नागरिकां समोर निर्माण झाला आहे. तर येथील माजी सरपंच दतात्रय पाटील,रुपसिंग राठोड,गणपत वरजू राठोड सह यांनी स्वखर्चाने गावकऱ्यांना सोबत घेऊन तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यावर मुरूम टाकून दुरुस्ती केली आहे.मलकजाम तांडा ते मलकजाम हा रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत आहे.
पण अनेक वेळा या रस्त्या संबधी जिल्हा परिषद बांधकाम विभाग नांदेड येथे लेखी व तोंडी सांगून आणि अनेकवेळा दैनिक वृत्तपत्राच्या माध्यमातून माहिती देऊन सुद्धा याकडे मात्र जिल्हा परिषद बांधकाम विभागाने सर्रास दुर्लक्ष केले आहे. मलकजाम हे गाव मराठवाडा व तेलंगना सीमेवर आहे.तर येथील नागरिकांना बाजार पेठ म्हणून शिवणी,म्हैसा, निर्मल आहे.पण यांना गावाच्या बाहेर निघाले की रस्त्याच्या खराबीमुळे या गावाला एक ही वाहन येत नाही.या गावात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांचे पारिवारिक संबंध तेलंगणा राज्यात जास्त आहेत.तर वेळी अवेळी पाहुणचार,सुखदुःखला जाण्यासाठी रस्त्या खराबीमुळे वाहन भेटेना या साठी अनेक परिवारांनी तेलंगाणा राज्यात स्थलांतर केले आहे.
तेलंगणा सीमेलगत असलेल्या किनवट तालुक्यातील अनेक गावे,वाडीतांडे,वस्त्या आजही मूलभुत,पायाभूत,व नागरी सेवा सुविधांपासून वंचित आहेत.रस्ते,पाणी,लाईट, स्वच्छता यासाठी ग्रामस्थांना पराकोटीचा संघर्ष करवा लागतोय अशीच अवस्था तेलंगणा सीमेवार असलेल्या किनवट तालुक्यातील मलकजामसह,पांगरपहाड, आंदबोरी,चिखली,कंचली,मारलागुंडा, तोंटम्बा, चंद्रुनाईक तांडा सह अनेक तांड्यावाड्यातिल ग्रामस्थांची अवस्था रस्त्या अभावी बिकट झालीय.कोणत्याही गावाच्या प्रगतीचे मूल्यमापन तेथील रस्ता,मोबाईल नेटवर्क व दळणवळणाच्या प्रभावी व नीटनेटक्या व्यवस्थेनुसार केले जाते. गावातील रस्ता चांगला असेल तर विकासाची गंगा वाहते.मात्र रस्ता नसेल तर गावाचा विकास खुंटतो. अशीच परिस्थिती तेलंगणा सीमेवर असलेल्या अनेक गावांचाही विकास रस्त्याअभावी खुंटला आहे.तर मागील २० वर्षांपासून मलकजाम ग्रामस्थ हे रस्त्यासाठी झगडत आहेत . प्रशासन दरबारी व लोकप्रतिनिधींकडे गाऱ्हाणे मांडतायेत, मात्र अद्याप रस्त्याची समस्या मार्गी लागली नाही हे दुर्दैव्य! आश्वासनात पुढारी, लोकप्रतिनिधी माहीर असतात,हे सर्वज्ञात आहे.