नविन नांदेड। संततधार पावसामुळे भायेगाव ता,जि, नांदेड येथील रमेश नानाराव कोल्हे, यांच्ये राहते घर पडुन मोठं नुकसान झाले असून संसार उपयोगी वस्तू व अन्नधान्याची नासाडी झाली महसूल प्रशासनाने तात्काळ मदत करण्याची मागणी संरपच प्रतिनिधी बालाजी पाटील भायेगावकर यांनी केली आहे.
नांदेड तालुक्यातील भायेगाव येथे गेल्या अनेक दिवसांपासून संततधार पावसामुळे रमेश कोल्हे यांच्या घर पडुन संसार उपयोगी वस्तू व अन्नधान्याची नासाडी झाली,ही घटना कळताच तात्काळ संरपच प्रतिनिधी बालाजी पाटील भायेगावकर यांनी पाहणी करून नांदेड तहसीलदार किरण अंबेकर यांना माहिती दिली असून प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून मदत करावी अशी मागणी केली आहे.
या बाबत तहसीलदार किरण अंबेकर यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले असून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न शिल असल्याचे सांगितले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संततधार पावसामुळे नागरीकात भिंतीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांनी आपल्या घराची काळजी घेऊन सतर्क राहण्याचे आवाहन संरपच प्रतिनिधी बालाजी पाटील भायेगावकर, ऊपसंरपच बालाजी कोल्हे यांनी केले आहे.