नांदेड। मातुळ येथील ३३ केव्ही उपकेंद्राचे यंत्रचालक सुदर्शन गिरोड यांच्या पत्नी चित्राताई सुदर्शन गिरोड यांचे ३ जुलै रोजी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्या ३६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात त्यांचे पती, एक मुलगा एक मुलगी, सासू, नणंद असा परिवार आहे.
चित्राताई गिरोड यांच्या पार्थिवावर कांडली तालुका भोकर येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते बालाजीराव कंठेवाड, सुदाम पाटील, गजानन सावंत, प्रल्हाद आडे, शिवराज लंगडे, किशन डाखोरे, बालाजी लाडेकर, प्रा. सिद्धेश्वर शेटे, रंगनाथ राठोड, येल्लो वॉकिंग ग्रुपचे अनेक सदस्य यांच्यासह राजकीय ,सामाजिक क्षेत्रातील अनेकजण मोठ्या संख्येने उपस्थित होते. चित्राताई गिरोड या संत तुकडोजी महाराज वारकरी सांप्रदायातील कीर्तनकार गंगाधर गिरोड यांच्या भावजय होत.