नगर परिषदेची अभ्यासिका चालू करण्यासाठी विद्यार्थ्यांच धरणे आंदोलन -NNL


मुखेड, रणजित जामखेडकर।
मुखेड शहरातील जुन्या नगर पालिकेच्या ठिकाणी नव्याने तयार करण्यात आलेली अभ्यासिकेचे उदघाटन करण्यासाठी आज विद्यार्थ्यांचे तहसील समोर सकाळी ११ वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. 

मुखेड न.प.ची अभ्यासिका अंदाजे ५० लाख रुपये खर्च करुन विद्यार्थ्यांचा अभ्यास व्हावा यासाठी अभ्यासिका तयार करण्यात आली पण सध्या ती बंद अवस्थेत असल्याने शोभेची वास्तु बनली आहे. अभ्यासिका बांधूनही याचा  विद्यार्थ्याना  काहीच उपयोग होत नाही. 

या अभ्यासिकेचा फायदा  विद्यार्थ्यांना व्हावा व सदर अभ्यासिकेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटणकर अथवा सहाय्यक जिल्हाधिकारी तथा मुखेड नपच्या प्रशासक सौम्या शर्मा यांच्या हस्ते करावे अथवा कोणाच्याही हस्ते करा पण विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये असे विद्यार्थ्यांचे मत आहे.  आजच्या धरणे आंदोलनास सर्व विद्यार्थी - विद्यार्थीनीनी उपस्थित राहून सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले  आहे‌.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी