किनवटमध्ये महाराष्ट्र ग्रामिण बँकेचे ग्राहक सेवा केंद्र चोरट्यांनी फोडले -NNL


किनवट, माधव सूर्यवंशी|
मुख्य चौकातील महाराष्ट्र ग्रामिण बँकेचे ग्राहक सेवा केंद्र आज (१८ जुलै) च्या पहाटे तीन वाजताचे आसपास चोरट्यांनी फोडले. चोरट्यांच्या हाती कांहीच न लागल्याने प्रिंटर फोडून सर्व वाईरींग तोडली. महाराष्ट्र ग्रामिण बँक आणि कॅनरा बँकेला लागूनच हे सेवाकेंद्र आहे. या बँकांकडे रात्रीचे सुरक्षारक्षक असते तर चोरी झाली नसती. बँकांनी अलार्मलाॅकची व्यवस्था केल्याचे वृत्त आहे. उल्लेखनीय म्हणजे रात्री एक ते सकाळी नऊ वाजेपर्यंत विद्यूत पुरवठा बंद असल्याने चोरट्यांचा बिनधास्त वावर झाल्याचे समजते.

शहरातील मुख्य चौकात राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र ग्रामिण बँक असून त्याच बँकेचे खालच्या मजल्यात ग्राहकसेवा केंद्र आहे. लागूनच कॅनरा बँकसुद्धा आहे. बँकांनी अलार्मलाॅकची व्यवस्था केल्याने रात्री सुरक्षारक्षक ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. असते तर चोरट्यांनी हिंमत केली नसती सुगावा लागला असता. महत्वाची बाब म्हणजे रात्री एक वाजल्यापासून किनवट, गोकुंदासह अन्य ठिकाणचा विद्यूत पुरवठाच बंद होता.

तो आज (१८ जुलै) सकाळी नऊ वाजता सुरु झाला. त्याच संधिचा फायदा चोरट्यांनी घेऊन सदरचे ग्राहकसेवा केंद्र फोडले. शेटर तोडले, कांहीच न सापडल्याने प्रिंटर फोडले, वायरिंग तोडली, सी.सी.टी.व्ही.कॅमेरे फोडली. आज दिवसभर कामकाज विष्कळीत झाले. पोलीसांनी स्थळ पंचनामा केला. मालमत्तेच्या सुरक्षेसाठी प्रत्येकाने सजग राहिल्यास थोडाफार फरक बसू शकेल अशी उपस्थितांमध्ये कूजबूज चालू होती.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी