महाविकास आघाडीचे सरकार जाताच रोडच्या कामाला 'ब्रेक'
हदगाव, शे चांदपाशा। राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाण्याचे संकेत मिळताच शहरातील मुख्यप्रवेश रोडचे काम संथगतीने चालु होते. जसे सरकार बरखास्त झाले की या रोडचे काम पण बंद झाल्याने परिणामस्वरुप हदगाव शहराच्या हदगाव नादेड मुख्यप्रवेश रोडला कञाटदाराच्या अर्धवट कामामुळे नदी नाल्याचे पुराचे स्वरुप प्राप्त झाले यामुळे वाहतुकीला अडचणी निर्माण झाल्या आहेत.
या बाबतीत माञ सार्वजनिक बाधकाम विभाग (भोकर) गप्प असुन या बाबतीत कंञाटदार हा बड्या राजकीय नेत्याशी जवळीक असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी पण या बाबतीत पण दुर्लक्ष करित असल्याचे स्पष्ट दिसुन येत आहे. गेल्या काही दिवसापासून सततधार पावसामुळे अगोदरच शहरवासीयाचे व नदीकाठाच्या गावाचे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहराच्या मुख्यप्रवेश रोडचे काम ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सुरु केल्याने ते पण संथगतीने चालु केल्यानेही परिस्थिती उदभवलेली आहे.
या बाबतीत काही वृतपञानी या बाबतीत पावसाळ्याच्या अगोदरच अनेक बातम्या देवून प्रशासनास संबंधित कञाटदाराला जाग करण्याच प्रयत्न केला परंतु नेहमी प्रमाणे वृतपञाच्या बातम्या कडे दुर्लक्ष केले. या बाबतीत काही स्थानिक जबाबदार नेते व त्याचे कार्यकर्ते माञ भलत्याच कार्यक्रमात माश्गुल राहत असल्याने या शहराचे मुख्यरोडचे काम अर्धवट काम राहील्याने शहरात येणारी वाहतूक विस्कळीत झाल्याने बाहेरुन येणाऱ्या व शहरातील नागरिकांचे माञ पावसाळ्यात हाल होतांना दिसून येत आहे.