नांदेड। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड यांचेशी झालेली चर्चेअंती प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्या इशाऱ्या नुसार दि. ११ जुलै २०२२ रोजी पासून नांदेड जिल्हयात दिनांक १३/०७/२०२२ रोजी अतिवृष्टीचा धोका असल्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
त्यामुळे संभाव्य पूराची परिस्थिती विचारात घेता नांदेड जिल्हयातील इयत्ता १ ली ते १२ वीच्या सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक/ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना दिनांक १३ जुलै २०२२ या दिवशी सूटटी जाहीर करण्यात आली आहे.
प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांनी जिल्ह्यात होणारी अतिवृष्टी व पुराची संभावना या दृष्टीने दिलेला इशारा लक्षात घेवून जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी संयुक्त स्वाक्षरी करून जिल्ह्यातील सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक यांना पत्र जारी केले आहे. यानुसार पावसाच्या परिस्थितीला लक्षात ठेवून दि. 13 जुलै रोजी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा इयत्ता 1 ली ते 12 वी वर्गांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.