अतिवृष्टीने नुकसान झालेल्या हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट मदत देऊन आधार द्यावा -NNL

भाजपचे माजी तालुकाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गजानन तुप्तेवार यांची उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी  


मुंबई/नांदेड/हिमायतनगर/हदगाव, अनिल मादसवार|
हदगांव व हिमायतनगर तालुक्‍यात मागील काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे कधी न भरून निघणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, या नुकसानाईतून बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहिर करून दिलासा देणे गरजेचे आहे. अश्या आशयाचे निवेदन हिमायतनगर येथील भाजपचे माजी तालुकाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गजानन तुप्तेवार यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली आहे. 


हदगांव व हिमायतनगर तालुकयातील सर्व शेतकऱयांचे दिनांक ०८ जुलै ते १४ जुलै दरम्यान झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे व नदी - नाल्यात आलेल्या पुरांमुळे अतिवृष्टी होवुन शेतीचे (खरीप पिकाचे) हंगामातील पिकांचे संपुर्णत: नुकसान झाले आहे. यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली त्या शेतकर्यांना तर दुहेरी फटका बसला आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यापुढे दुबार पेरणीचे तर काही शेतकऱ्यांपुढे तिबार पेरणीचे मोठे संकट उभे झाले आहे. अतिवृष्टी होऊन शेतात जमलेल्या प्रचंड पाण्यामुळे दुबार - तिबार पेरणी करणे देखील सुध्दा शक्‍य दिसत नाही कारण रानात जाताच गुडगाभर पाय जमिनीत जात आहेत. बर्‍याच शेतामधील पिकासह जमिनी खरडुन गेलेल्या आहेत आजही सतत पाऊस सुरूच आहे. 

त्याच बरोबर अनेक घरामध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. बर्‍याच घराची पडझड झाली असून, अनेक कुटुंब निराधार झाले आहे. या सर्व परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, याची पाहणी शासनाच्या वतीने करून हदगांव व हिमायतनगर येथील शेतकऱ्यांना पंचनामे न करता सरसकट भरघोस मदत द्यावी आई आर्थिक संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी विनंती निवेदनातून गजानन प्रकाशराव तुप्तेवार यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली आहे.      

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी