नांदेड| जिल्ह्यात सोमवार 4 जुलै रोजी सकाळी 10 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 37.60 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 199.80 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात सोमवार 4 जुलै 2022 रोजी सकाळी 10 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस नांदेड- 37.20 (179.90), बिलोली- 41.10 (155.80), मुखेड- 25.80 (250.60), कंधार-51.60 (286.70), लोहा-68.40 (206.20), हदगाव-32.30 (161.10), भोकर- 36.40 (134.10), देगलूर-24.70 (254.50), किनवट- 34.50 (220.90), मुदखेड- 32.20 (232.40), हिमायतनगर-78.90 (282.40), माहूर- 11.60 (144.80), धर्माबाद- 19.10(156.80), उमरी- 37.10 (186.90), अर्धापूर- 40.80 (139.90), नायगाव- 41 (131.40) मिलीमीटर आहे.
काल झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील ग्रामदिन भागातील रस्ते वाहून गेले असणं, रस्त्यात पाण्याचे तळे साचल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. यामुळे वाहनधारक, शेतकरी, नागरिक वॆतागले असून, बांधकाम खात्याने त्या त्या भागातील रस्ते पूल आदींची पाहणी करून दुरुस्ती आणि नवीन रस्ते करून दळणवळणाची अडचण सोडवावी अशी मागणीही समोर येते आहे.