नांदेड| सारवाडी – कोडी दरम्यान दिनांक 21 जुलै ते 23 ऑगस्ट, 2022 दरम्यान तीन तासांचा ट्राफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे काही रेल्वे गाड्यांवर परिणाम होणार आहे तो पुढील प्रमाणे –
1) गाडी संख्या 17688 धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस दिनांक 22 जुलै ते 24 ऑगस्ट, 2022 दरम्यान दर बुधवारी, शुक्रवारी आणि रविवारी धर्माबाद येथून 60 मिनिटे उशिरा सुटेल.
2) गाडी संख्या 17617 सी.एस.टी. मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस दिनांक 21 जुलै ते 23 ऑगस्ट, 2022 दरम्यान दर मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी मनमाड ते जालना दरम्यान 90 मिनिटे उशिरा धावेल.
3) गाडी संख्या 12788 आणि 17232 नगरसोल ते नरसापूर एक्स्प्रेस दिनांक दिनांक 21 जुलै ते 23 ऑगस्ट, 2022 दरम्यान दर मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी नगरसोल ते जालना दरम्यान 20 मिनिटे उशिरा धावेल. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी.