नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा -NNL


नांदेड|
शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प आज 21 जुलै रोजी 70 टक्के क्षमतेने भरला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या सततच्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. 

बंधाऱ्यात येणाऱ्या पाण्याची आवक लक्ष्यात घेता विष्णुपुरी बंधाऱ्याचा एक दरवाजा विसर्ग 346 क्युमेक्स (12218 क्युसेस) विसर्ग सकाळी 10 वाजता नदीपात्रात सोडण्यात आला आहे. विष्णुपुरी बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस असणाऱ्या सर्व गावातील नागरिकांच्या मालमत्तेचे, जीवीताचे, पशुधनाचे, वीटभट्टी साहित्य, इतर कोणतीही हानी होणार नाही यासाठी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प बंधारा असर्जनचे पूर नियंत्रण अधिकारी यांनी केले आहे.

 जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 19.70 मि.मी. पाऊस

 जिल्ह्यात गुरुवार 21 जुलै रोजी सकाळी 8.20 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 19.70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 654.80 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

 जिल्ह्यात गुरुवार 21 जुलै 2022 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटर मध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड-12 (632.20), बिलोली-16.70(692), मुखेड- 27.70 (608.20), कंधार-12.80 (640.40), लोहा-11.70 (596.20), हदगाव-11.20 (599.70), भोकर-36.90 (767.10), देगलूर-26.70 (579.10), किनवट-13 (666.50), मुदखेड- 19.70 (828.70), हिमायतनगर-21 (846.30), माहूर- 4.90 (552.20), धर्माबाद- 46.60 (709.40), उमरी- 43(818.60), अर्धापूर- 9 (616.80), नायगाव-20.50 (603.50) मिलीमीटर आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी