नविन नांदेड| स्पर्धाचा युगात विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेत यश मिळविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे मत सेवानिवृत्त मनपाचे अंभियता सुग्रीव अंधारे यांनी सिडको येथे मानस बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित अण्णा भाऊ साठे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीने आयोजित सेवापुरती व गुणवत्ता सत्कार सोहळा प्रंसगी केले.
मानस बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित, अण्णाभाऊ साठे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, सेवापुर्ती गौरव व गुणवतांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन २४ जुलै रोजी अण्णा भाऊ साठे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र येथे सिडको येथे आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यात सेवानिवृत्त अधिकारी व गुणवत्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला असून, यात सेवानिवृत्त अधिकारी सुग्रीव अंधारे (सेवानिवृत कार्यकारी अभियंता, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड, वी.एन. सुर्यवंशी सेवानिवृत्त मुख्याध्यापक, एन.डी.रोडे, सेवानिवृत सहाय्यक पोलिस निरिक्षक आयजी ऑफिस, नांदेड आनंदराव पांगरेकर, सहाय्यक उपनिरिक्षक, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल, माधवराव डोपले ,एम. फील. पदवी प्राप्त, सेवानिवृत्त पोलिस शिवाजी कोंडीबा वाघमारे, सेवानिवृत्त सैनिक माधव बंसवते,यांच्या व डॉ.ईशवरी नामवाडे, डॉ.शिवकन्या काळे, डॉ.अमित रोडे,कृष्णा बाबळे, व माध्यमिक व उच्च माध्यमिक,एम,ए, एम,एस.डब्लु, परिक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या गुणवत्ता धारकांच्या सत्कार सन्मान चिन्ह,शाल श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला होता.
प्रमुख व्याख्याते म्हणून साहित्यीक शेख निजाम गंवडगावकर, यांनी समाजातील अनेक विषयांवर मार्गदर्शन केले तर लसकमाचे प्रदेश महासचिव गुणवंत काळे यांनी ही, मार्गदर्शन केले तर प्रमुख उपस्थिती म्हणून दिपक गवलवाड ऊप कोषागार अधिकारी,डॉ.राहुल वाघमारे आरोग्य अधिकारी भोकर,प्रकाश कांबळे ऊप कार्यकारी अभियंता हे होते. या वेळी उपस्थित सेवानिवृत्त सत्कार मुर्ती व छाया अंधारे,प्रकाश कांबळे, व व्याख्याते यांनी मार्गदर्शन पर भाषण केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.एच.वाडेकर हे होते,तर प्रास्ताविक प्रा. नामदेव वाघमारे, सुत्रसंचलन बालाजी गवाले यांनी केले, कार्यक्रमास दलीत मित्र नारायण कोंलबीकर,आंनदराव गायकवाड,आंनदा वाघमारे,राजु गायकवाड,शंकर नामवाडे, आरोग्य अधिकारी के.पी.गायकवाड,से.ना.पवार,मनिष वाडेकर,पंढरी बाबळे, राम बाबळे, माधव बंसवते यांच्या सह समाजातील बांधव यांच्यी ऊपसिथीती होती, कार्यक्रम यशस्वीतेसाठी पि.एम. सुर्यवंशी,एस.एन.गजले,एच.ई.गोपले, डॉ.एस.एन.लोखंडे, डॉ.आर.जे.गवाले,एस.एन, धर्माधिकारी, बि.एन.गवाले, बि.एन.गुडीले,एम.एम.बंसवते,प्रा. डॉ.एन.के.वाघमारे यांनी केले .