डॉ.शंकररावजी चव्हाण गुरूरत्न पुरस्कारातून मिळते कर्तृत्वानांना प्रेरणा-नरेंद्रदादा चव्हाण -NNL


नांदेड।
सातत्याने मागील चौदा वर्षापासून देशपातळीवर आपल्या कार्यातून नावलौकीक मिळवणार्‍यांना डॉ.शंकररावजी चव्हाण गुरूरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असून अशा कर्तृत्ववान व्यक्तीमत्वासाठी उर्जा निर्माण करणारा आणि प्रेरणास्त्रोत पुरस्कार असल्याचे प्रतिपादन बायोशुगरचे चेअरमन नरेंद्रदादा चव्हाण यांनी केले.

मीमांसा फाऊंडेशन, व्हाईस ऑफ मिडीया, समीक्षा, मंथन क्रिएटिव्ह ग्रुप, पत्रकार प्रेस परिषद व ह्यूमन राईट्स फाऊंडेशनच्यावतीने दरवर्षी माजी गृहमंत्री, पाणीदार नेतृत्व, मराठवाड्याचे भगीरथ श्रद्धेय डॉ.शंकररावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त राज्यातीलच नव्हे तर देशातील नामवंत व्यक्तीमत्वांचा डॉ.शंकररावजी चव्हाण गुरूरत्न पुरस्कार देऊन सन्मानीत केल्या जातो. यंदाचे हे चौदावे वर्ष आहे. यावेळी बायोशुगरचे चेअरमन नरेंद्रदादा चव्हाण, नांदेड मनपाच्या महापौर जयश्रीताई पावडे, पद्मजा सिटीचे संचालक तथा नगरसेवक बालाजीराव जाधव, पुण्याचे पत्रकार राजेंद्र वाघमारे, काँगे्रसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

डॉ.शंकररावजी चव्हाण पुरस्काराने  राजमाता जिजाऊचे वंशज तथा उद्योग मार्गदर्शक प्रा.नामदेवराव जाधव, मागील 35 वर्षापेक्षा अधिक काळापासून दुबई येथे व्यवसाय करणारे राजेश बाहेती,   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारतीय राजकारणातील अनेक दिग्गजांची कॉफी टेबल बुक्स तयार करून क्रिएटिव्ह सेवा देणारे डॉ.नरेंद्र बोरलेपवार, दुभंगलेले ओठावर हजारो शस्त्रक्रिया करून लातूर येथे मोफत उपचार केंद्र चालवणारे डॉ.विठ्ठलराव लहाने, समाजसेवाच ही ईश्वर सेवा मानून दिशा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मदत व गरजवंताना वैद्यकीय सेवा देणारे अभिजीत देशमुख, सैनिकी शाळेत विद्यार्थ्यांना देशभक्तीचे धडे देऊन आता इंग्रजी शाळेतही संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे प्राचार्य सच्चीदानंद जोशी, शून्यातून विश्व निर्माण करत राजभोग आटासह वेग वेगळ्या व्यवसायात ब्रँड निर्माण करून शेकडोंना रोजगार देणारे विजय केंद्रे आणि खुलताबाद येथे शैक्षणीक संस्थेच्या मार्फत गरजूंना मदत करून सामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे डॉ.मजहर खान यांचा गौरव करण्यात आला.

कुसूमताई महिला भूषण सामाजीक पुरस्कार मुंबईच्या संपादीका सोनल खानोलकर आणि माजलगावच्या सामाजीक कार्यकर्त्या सौ.शिलाताई शिंदे यांचाही सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच अमृत महोत्सवी वर्षानिमित्त माजी प्राचार्य डॉ.रावसाहेब शेंदारकर व प्रा.सौ.विद्याताई चव्हाण शेंदारकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. डॉ.शंकररावजी चव्हाण गुरूरत्न पुरस्कार व कुसूमताई चव्हाण महिला भूषण पुरस्कारातून विविध क्षेत्रातील मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करून पुरस्काराचे सातत्य कायम ठेवल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

सदरील सोहळ्याच्या सुरूवातीला श्रद्धेय डॉ.शंकररावजी चव्हाण व सौ.कुसूमताई चव्हाण यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांचे मंथन ग्रुपचे रामेश्वर धुमाळ, अरविंद पाटील, शिवहारी गाढे, उज्वला दर्डा यांनी शाल व पुस्तक देवून सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामेश्वर धुमाळ यांनी केले. कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचलन प्रा.संतोष देवराये यांनी तर आभार संपादक रूपेश पाडमुख यांनी मानले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी