भाजपा जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पा. गोजेगावकरांनी स्वखर्चाने गाळ काढून महामार्ग खुला करुन दिला -NNL

मुक्रामबाद गावा जवळील लहाण पुलावरून पाणी वाहुन मोठ्या प्रमाणात गाळ व कचरा जमा झाल्याचे लक्षात येताच भाजपा नेते व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी स्वखर्चाने बुलडोझर लावून रस्त्यावरील गाळ व कचरा काढुन वाहनधारकांना रस्ता खुला करुन दिल्याने प्रवासानी समाधान व्यक्त होत आहे.


मुखेड, रणजित जामखेडकर।
१४ जुलै - देगलूर - उदगीर रोडवरील मुक्रमाबाद नजीक असलेल्या लहानशा पुलावरुन सततच्या पावसामुळे पाणी जात होते त्यामुळे अनेक तास वाहतुक ठप्प होती . त्यामुळे प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता यावा म्हणून भाजपाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी स्वखर्चाने बुलडोझर लावुन पुलामध्ये अडकलेला गाळ व कचरा काढुन वाहतुक सुरळीत करण्याचे मुक्रमाबाद ग्रामपंचायतील आदेशित केले.

 


यामुळे त्याठीकाणी सरपंच प्रतिनिधी बालाजी बोधणे व उपसरपंच सदाशिव बोयवार यांना पुलाकडे जावुन तेथील अडलेला कचरा व गाळ इत्यादी बुलडोझर ने काढुन मार्ग मोकळा करण्यास सांगितले . यावेळी मुक्रमाबाद पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस उपनिरीक्षक संग्राम जाधव , सरपंच प्रतिनिधी तथा ग्रा.प. सदस्य बालाजी बोधणे , उपसरपंच सदाशिव बोयवार ग्रा.प. सदस्य प्रतिनिधी राहुल ईंदुरे लखमापुरचे सरपंच बालाजी पाटील , राम कुडले यांनी जातीने लक्ष देउन पाईपातील

आडकलेला गाळ व लाकडे काढुन पाईप खुले केल्यामुळे कांही वेळातच पुलावरुन वाहणारे पाणी पाईपातुन जात असल्यामुळे पुलावरुन वाहणारे पाणी कमी झाले . यामुळे वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला असून प्रवाशांनी गोजेगावकरांचे व ग्रा.प. चे आभार व्यक्त करत आहेत .

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी