जिल्हाधिकारी यांच्याकडे शिवशंकर काळे यांची मागणी
उस्माननगर, माणिक भिसे| नांदेड जिल्ह्यात मागील दहा ते बारा दिवसा पासून संततधार पाऊस सुरु असून जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतातील उभे पीक पाण्याखाली गेलेले आहेत, काहीकाही ठिकाणी तर पूर्ण शेतातील पीक वाहून गेल्याचे दिसून येत आहे.
अनेकांची कच्चे बांधकाम असलेले घर जमीनोंद्धवस्त झालेत. त्यामुळें संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले होते मुसळधार पावसामुळे मेढ्याचा मृत्यू देखील झाला आहे. वरुणराजाच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा याचे निवेदन शिवशंकर काळे ( शहीद जवान हानुमंत काळे स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा ग्रामसंवाद संघटनेचे जिल्हा संघटक व ग्रामपंचायत सदस्य) यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांच्या कडे मागणी केली आहे.
नांदेड जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळत असताना शेतकऱ्यांचे पिके पाण्याखाली गेले ,काही ठिकाणी थंडीमुळे मुक्या जनावराचा मृत्यू झाला.मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली.अनेकांना इतरांच्या घराचा किंवा आहे त्याच घरात जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. अशापैकी काही नुकसानग्रस्त लोकांचे आवास योजनेमध्ये नावे आले असतील अशांना नागरिकांना प्रथम प्राधान्य दिल्यास झालेले नुकसान थोडेफार प्रमाणात भरून निघेल. तसेच घरपडीमुळे ज्या इतर नागरिकांचे नुकसान झाले असतील अशांना देखील तात्काळ मदत देण्यात यावी.
एकंदरीत अशा नुकसानग्रस्त नागरिकांना व शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून लवकरात लवकर मदत जाहीर करावी अशा अशायाचे निवेदनाव्दारे जिल्हाधिकारी यांच्याकडे शिवशंकर काळे सामाजिक कार्यकर्ते तथा सदस्य ग्रामपंचायत उस्माननगर यांनी मागणी केली आहे.