अर्धापूर, निळकंठ मदने| तालुक्यातील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणूकसाठी १५ जुलै ही उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख असल्याने शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी अर्ज दाखल केले,पण या निवडणूकीला ३० सप्टेंबर पर्यत स्थगीतीचे शासनाचे पत्र येऊन धडकल्याने सध्याची निवडणूकीची प्रक्रिया स्थगीत झाल्याचे सबंधीत अधीकाऱ्यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना सांगितले.
भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला,१५ जुलै ला उमेदवारी दाखल करण्याची शेवटची तारीख होती, यामुळे शेवटच्या दिवशी माजी आमदार तथा माजी भाऊरावच्या उपाध्यक्षा सौ.अमिता चव्हाण,बायोशुगरचे अध्यक्ष नरेंद्र चव्हाण, चेअरमन गणपतराव तिडके, उपाध्यक्षा प्रा.कैलास दाड, प्रवीण देशमुख, व्यंकटराव साखरे, पप्पू बेग, साहेबराव राठोड यांच्यासह १०७ जणांनी उमेदवारी उमेदवारी दाखल केली आहे.यामध्ये विद्यमान संचालकासह नवीन उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली आहे.
पण शुक्रवारी ४ वा.या निवडणूकीला ३० सप्टेंबर पर्यत स्थगीतीचे आदेश आल्याचे सबंधीतांनी सांगितले.या निवडणूकीचे निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण हे काम पाहत आहेत,विरोधकांनी निवडणूक लावण्यासाठी प्रयत्न केले आहेत.अनेकजण अर्ज परत घेण्याची शक्यता होती, निवडणूक रंगात येत असतांना या निवडणूकीला स्थगीती मिळाल्याने उमेदवारांचा हिरमोड झाला आहे,आता पुढील प्रक्रिया आक्टोंबर महिन्यात होणार असल्याची चर्चा आहे.