पोहायला गेलेल्या युवकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू -NNL


मुखेड, रणजित जामखेडकर|
विहिरीत पोहायला गेलेल्या दोन युवकांपैकी एका युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना १५ जुलै रोजी दुपारी तालुक्यातील मौजे हिप्परगा येथे घडली आहे. दुसरा युवक बालबाल बचावला आहे.

तालुक्यातील हिप्परगा येथील विष्णू बाबु कांबळे (१९) हा जळकोट येथील गुरुदत्त महाविद्यालयात १२ वी विज्ञान शाखेत शिकायला होता. शुक्रवारी विष्णू कांबळे हा त्याचे नातेवाईक असलेल्या सुमीत हैबती सोनकांबळे (रा.केरूर) याच्यासोबत गावाजवळील संतुका कपाळे यांच्या शेतात पोहायला गेला होता. 

यावेळी विष्णू हा विहिरीतील गाळेमध्ये अडकला व त्यातच त्याचा मृत्यू झाला. तर सुमीत सोनकांबळे हा कसाबसा कडेला येवून बचावला. सुमीत सोनकांबळे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी