नगरपंचायतीच्या नाले सफाईचा बोजवारा उडाल्याने विविध घरांना पाण्याचा वेढा
हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे, यामुळे शहरानजीक वाहणाऱ्या नाल्याचे घाण पाणी शहराच्या बाजूने असलेल्या सर्वच नाल्यावरून वाहत असल्याने शहरात येणं-जाणं करणाऱ्या नागरिकांचा संपर्क तुटला आहे. तसेच शहरात प्रवेश करणाऱ्या मुख्य कमानीजवळ पाणी साचून राहत असल्याने वाहतुकीला अडथळा येतो आहे. नगरपंचायतीने पावसाळ्यापूर्वी नाल्याची सफाई केली नसल्याने पाणी थांबून शहर परिसरात जमा होऊन अनेकांच्या घरं वेढले आहे. यामुळे सखल भागातील नागरिकांना घरातून बाहेर घणे अवघड बनले आहे.
हिमायतनगर शहरातून रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या पुलावरून पाणी जाते आहे. यामुळे वाहतूक खोळंबली असून, परिसरातील घरांना पुराच्या पाण्याचा वेढा आला आहे. नगरपंचायत प्रश्नाने येथील नाल्याजवळील निरुपद्रवी झाडे तोडून पाण्याचा मार्ग मोकळा केला असता तर पुराचे पाणी येथे अडकले नसते तसेच राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने येथील पूल केला नसल्याने नागरिक वाहनधारक संताप व्यक्त करत आहेत.
शहराजनिकच्या बोरी मार्गाकडे नडव्याच्या पुलावरून पुराचे पाणी वाहू लागल्याने ५ तासापासून मार्ग बंद पडला आहे. नगरपंचायत प्रशासनाने या नाल्याची जेसीबीने पावसाळ्यापूर्वी सफाई केली असती तर आज हि परिस्थिती उदभवली नसती. आणि येथे मंजूर झालेल्या पुलाचे काम झाले असते तर रस्ता बंद झाला नसता अशी प्रतिक्रिया शेतकरी, नागरीकातून पुढे येत आहे.