भोकरफाट्याजवळ काळ्या बाजारात जाणारे दोन ट्रक सह ३७ लाखाचा ऐवज ताब्यात -NNL


अर्धापूर, निळकंठ मदने|
तालुक्यातील भोकर फाटा येथील सत्यगणपती मंदीराच्या समोर सोमवारी विनापरवाना काळ्या बाजारात जाणारा दोन ट्रकमध्ये प्रत्येकी २७ टन तांदूळ अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या पथकाने पकडला असून, अर्धापूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोकरफाटा हे महत्वाचे ठरले असून,या महामार्गावरुन ट्रकमध्ये अवैध पणे कतलीसाठी जणावरे, अवैध मार्गाने काळ्या बाजारात जाणारा माल, अवैध वाहतूक यासाठी नामांकित ठरले आहे, अवैध जणावरांचे पाच ट्रक पकडून कारवाई झाल्यानंतर सोमवारी अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांच्या पथकाने भोकरफाटा येथील सत्यगणपती कमानी समोर काळ्या बाजारात जाणारा राशनचा ट्रक क्र.जी जे २५यु ८०९७ बारा लाख किमतीचा ट्रक त्यामध्ये पांढऱ्या रंगाची पोत्यामध्ये अंदाजे २७ टन माल त्याची साडेसहा लाख रुपये व ट्रक क्र.जी जे ३६ व्ही २९७९ या ट्रक ची किंमत १२ लाख या ट्रक मध्ये २७ टन तांदूळ असा एकूण ३७,५०,००० रुपयांचा मुद्देमाल पकडला.

यामध्ये सामील असलेले आरोपी हिराभाई रामभाई सिंधल वय २७ चालक रा.राणावाव ता राणावाव जि पोरबंदर गुजरात,भरत चन्नाभाई ओडेदरा वय ३२ चालक रा देवडा ता कुतीयला जि पोरबंदर गुजरात अन्य दोन यांच्यावर अर्धापूर पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक कपील आगलावे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणी पोलिस उपविभागीय अधिकारी अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक जाधव अधिक तपास करीत आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी