नांदेड। प्लास्टिक साहित्य वापर केल्या प्रकरणी मनपा पथकाने नवीन कौठा येथील डि मार्टला लावला पाच हजार रुपये दंड आकारून साहित्य जप्त केल्याची कार्यवाही २ जुलै रोजी केली आहे.
१ जुलै पासून राज्यात व नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या हद्दीत प्लास्टिक साहित्य वापर करणा-या वर नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका क्षेत्रात मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाणे यांच्या आदेशानुसार उपायुक्त निलेश सुंकेवार , यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता विभागाचे मुख्य स्वच्छता निरीक्षक वशिम तडवी यांच्या नेतृत्वाखाली सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या नवीन कौठा येथील डी मार्ट येथे प्लास्टिक साहित्य वापर असलेल्या वस्तू विक्री साठी ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आल्या वरून ही कार्यवाही करण्यात येऊन पाच हजार रुपये दंड व साहित्य जप्त करण्यात आले. यावेळी सिडको क्षेत्रीय साहयक आयुक्त डॉ. राईसोधदीन व स्वच्छता निरीक्षक किशन वाघमारे,मोहन लांडगे,किशन तारू शिपाई कंधारे यांच्या सह कर्मचारी ऊपसिथीत होते.