हिमायतनगर। आझादी का अमृत महोत्सव निम्मीत दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी व वितरण मोहिम अंतर्गत ग्रामीण रुग्णालय हिमायतनगर येथे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
हिमायतनगर तालुक्यातील जिल्हा परिषद गट सरसम व दुधड गट अंतर्गत दिव्यांग प्रमाण पत्रा साठी ऑन लाईन नाव नोदणी केलेल्या दिव्यांग बांधवाची खाली दर्शविलेल्या तारखेस तपासणी करून प्रमाण पत्र वाटप करण्यात येईल व या शिबीरास नेत्र रोग तज्ञ डॉ. राजेश पवार व अस्थिव्यंग डॉ स्वामी प्रदीप हे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती ग्रामीण रुग्णालय हिमायतनगर चे वैद्यकिय अधिक्षक डॉ डि.डि. गायकवाड व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एस .पी. पोहरे यांनी दिली आहे.
नेत्र तपासणी करीता ऑन लाईन नोंदणी केलेली ग्रामीण भागातील ९३ लाभार्थी यांनी दि.४/७/२०२२,११/७/२०२२,२५/७/२०२२ व ८/८/२०२२ व अस्थिव्यंग तपासणी दि.६/७/२०२२, १३/७/२०२०२२, २७/०७/२०२२ व ३/८/२०२२ या कालावधीत पूर्ण करून आरोग्य विभागास सहकार्य करावे असे आवाहन आशा समन्वयक श्री चौधरी कृष्णा पांडुरंग यांनी केले. ऑन लाईन नोंदणी पात्र लाभधारकास माहिती देण्यासाठी आरोग्य कर्मचारी ,आशा स्वंय सेविका व अंगणवाडी कार्यकती मोलाचे सहकार्य करीत आहेत तरी पात्र लाभार्थी नी शिबीराचा लाभ घ्यावा.