नांदेड। नांदेड येथील शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथे कक्ष क्रमांक 32 येथील तळमजल्यातील रुग्णांना एका पलंगावर दोघेजण ॲडजस्ट व्हा असा आग्रह केला जातो आहे.
नांदेड विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता एका पलंगावर दोघांना राहण्याचा आग्रह केला जात आहे. 30 जुलै 2022 रोजी सायंकाळी सहा वाजता कक्ष क्रमांक 32 येथील रुग्णांना कळविण्यात आल्यामुळे त्रस्त रुग्णांची अवस्था अत्याधिक त्रस्त होण्यासारखी झाली.
याबाबत रुग्णालय प्रशासनाने सांगितले की रुग्णांची संख्या वाढल्यामुळे बाजूचा इतर रुग्णांचा कक्ष वापरण्यात आला होता. त्यांच्याकडील त्यांच्या कक्षाचे रुग्ण लक्षात घेता एका पलंगावर दोन रुग्ण ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. दरम्यान श्रीमान डॉक्टर जमदाडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळे जेष्ठ पत्रकार गोविंद मुंडकर यांनी याबाबतची माहिती जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर व डॉ जमदाडे यांना व्हाट्सएपच्या माध्यमातून दिली आहे.