विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या कडे रा.वि.काँ.ज़िल्हाध्यक्ष कन्हैया कदम यांची मागणी
नांदेड। राष्ट्रवादी विधार्थी काँग्रेस चे शहर ज़िल्हाध्यक्ष कन्हैया कदम व त्यांच्या शिष्ठमंडळाने विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना भेटून नांदेड ज़िल्हासह पूर्ण राज्यभरा मध्ये मागील काही दिवसापासून अतिवृष्टी झालेली आहे .
दरवषी पेक्ष्या या वेळी खूप जास्त प्रमाणात पाऊस पडला आहे ,तसेच ज़िल्हातील खूप गावांचा याचा जोरदार फटका बसला असून गावातील लोकांच्या घरादारात पाणी शिरले होते त्या मुळे त्यांच्या दैनंदिन गरजेच्या वास्तूचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसून येते .शेतकऱयांच्या शेतातील पिके हे आति मुसळधार पाऊसा मुळे पाण्यात वाहून गेले आहेत तसेच पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे .त्यांना 2-3 वेळा पेरणी करावं लागली तसेच हजारो शेतकऱयांच्या शेतामधील पाणी हे ओसरले नसून त्यांना या हंगामात पीक घेणे सुद्धा श्यक्य होणार नाही शेतकरी हा खूप मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे .
शेतकरी व शेतमजूर यांचे पाल्य हे वेगवेगळ्या क्षेत्रात शिक्षण घेत असतात सध्या प्रवेश प्रक्रिया चालू आहे परंतु त्याच्या कडे प्रवेश घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया शुल्क सुद्धा भरण्यासाठी पैसे नाहीयेत व भविष्यात वेगवेगळे शैक्षणिक ,परीक्षा शुल्क असतात ते सर्व शुल्क माफ करावे जेणे करून त्यांचे कोणतेही पाल्य शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत या साठी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी ही मागणी राज्य सरकार कडे करून मागणी मान्य करण्यासाठी भाग पडावे अशी विनंती निवेदन देऊन केली. यावेळी ज़िल्हाध्यक्ष कन्हैया कदम ,फैसल सिद्दीकि, प्रसाद पवार , ऋषिकेश गीते ,रोहित पवार ,प्रथमेश लाटकर ,मो.आरसलान इत्यादी जण उपस्तिथ होते.