बंदुकधारी टोळक्यानी केली शहरातील अवैध कल्बवर धाड टाकुन १५ लाखांची छापेमारी -NNL

चोरीचा मामला मामाही थांबला, अखेर बंदुकधारी दरोडेखोरानींच टाकली अवैध कल्बवर धाड 

महाराष्ट्र - कर्नाटक राज्याच्या सिमेवर असणाऱ्यां मुखे शहरासह तालुक्यात मटका किंग, गुटखा किंग , कल्ब किंग आपले बस्तान बसवले आहेत यांची दररोज लाखो रुपयांची उलाढाल आहे. तालुक्यातील पोलिस , महसुल व स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांना महिनेवारी तनखा मिळत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करतात याचा फायदा उचलुन मुखेड शहरातील एक्या कल्बवर अखेर बंदुकधारी दरोडेखोरानींच धाड टाकल्याची चर्चा शहरातील नागरिकांमध्ये चर्चा आहे.


मुखेड, रणजित जामखेडकर।
शहरात लातूर रस्त्यावर चालत असलेल्या एका अवैध क्लबवर चार दिवसापुर्वी १० ते १२ जणांच्या टोळक्याने तोंडाला काळ्या रूमाली बांधून बंदुक , तलवारी व कत्तीचा धाक दाखवून अंदाजे १५ लाखांचा ऐवज व १९ तोळे सोन्याची चैन व दागिने लुटल्याची घटना रात्री सव्वा दहाच्या सुमारास घडली . 

या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरात मागील काही महिन्यापासून शहरातील रिकाम्या जागेवर अवैध जुगार क्लब चालविण्यात येत होते. यातच चार दिवसापुर्वी एक मोठा डाव बसणार असल्याची काहीशी कुणकुण लागलेल्या १० ते १२ जणांच्या अज्ञात टोळक्याने तोंडाला काळ्या कपड्याच्या पट्टया बांधून लातूर रस्त्यावर असलेल्या एका रिकाम्या जागेवर रात्री सव्वा दहाच्या सुमारास बंदुक , तलवार , कत्ती घेऊन त्या ठिकाणी समोर येईल त्याला मारहाण करत दहशत निर्माण केली.

 त्या ठिकाणी असलेले अंदाजे १५ लाख रूपये रोख व १९ तोळ्यांच्या गळ्यातील चैन,अंगठी आदी हिसकावून घेऊन सोबत आणलेल्या इर्टिगा व इनोव्हा गाडीतून पळ काढला . घटना घडताच काही क्षण गोंधळलेल्या जुगाऱ्यांना काहीच कळेना की काय झाले , कोण होते . या वेळी प्रत्येकजण आपला जीव मुठीत धरून पळ काढत स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करत होता . यातच एकाने भ्रमणध्वनीवरून शहरातील एका कार्यकर्त्याला सांगितल्याने सदरची घटना उजेडात आली . या घटनेची शहरात चवीने चर्चा केली जात आहे . 

नांदेड शहरात मागील काही महिन्यामध्ये बंदुकीच्या जोरावर खूनाच्या लुटीच्या घडल्या होत्या . अशाच प्रकारची घटना शहरात घडल्यामुळे बड्या व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे . या घटनेबाबत जिल्हास्तरावरील वरिष्ठ पोलिस अधिकारीही या घटनेबाबत मुग गिळून गप्प असल्याने पोलिसांच्या कर्तव्यावर शंका निर्माण होत असून याची परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक व पोलिस अधिक्षकांनीच दखल घेऊन भयभीत झालेल्या व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी जनतेतून केली जात आहे. ‌

स्थानिक गुन्हे शाखा व संबंधित अधिकाऱ्यांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह..?

जिल्ह्यात अवैध धंद्यावर आळा घालणारी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी एका ठरावीक तारखेस शहरात हजर होत असल्याने त्यांचा फारसा वचक राहिला नाही. यामुळेच शहरासह तालुक्यात अवैध धंद्यानी पुन्हा डोके वर काढले आहे . ही घटना घडल्याची कुणकुण लागताच कोणाची दाद - फिर्याद नसतानाही स्थानिक गुन्हे शाखेचे काही अधिकारी दोन दिवसांपासून शहरात फेर फटका मारत असून अजून पर्यंत ही घटना कोण केली याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे . या घटनेबावत स्थानिक पोलिसांकडे चौकशी केली असता याप्रकरणी अजूनपर्यंत कोणतीही फिर्याद आली नसल्याची माहिती मिळाली .

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी