अर्धापूर। तालुक्यातील पार्डी (म) येथील रहिवासी व आश्रम शाळेचे मुख्याध्यापक गोविंदराव हासनराव मदने वय(५४) यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले,ते शिक्षणप्रेमी होते, यापुर्वी हादगाव येथील आष्टीकरांच्या डि एड काॅलेजचे प्राचार्य होते.
त्यांच्या पश्चात वडील,भाऊ, १ मुलगी,२ मुले,नातू असा परीवार आहे.त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी २६ जुलैला दुपारी २ वा.पार्डी ता.अर्धापूर जि नांदेड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. से नि मुख्याध्यापक हासनराव मदने यांचे ते जेष्ठ चिरंजीव होते,तर रामराव मदने व डॉ तुळशीराम मदने यांचे ते वडील होत.