अर्धापूर, निळकंठ मदने| शेतातील नापिकी व कर्जबाजारीला कंटाळून तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती त्या शेतकरी कुटुंबातील वारसांना शासनाच्या वतीने प्रत्येकी १ लाख रु. मदतीचा धनादेश मा.आ.अमिताताई अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते अर्धापूर येथील तहसील कार्यालयात दि.१८ जुलै २०२२ रोजी देण्यात आला.
अर्धापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथील शेतकरी भगवान विठ्ठल साळवे यांनी कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली होती तसेच बामणी येथील ईरबाजी जळोजी देलमडे या शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गोदावरी नदीपात्रात पाण्यात उडी मारुन आत्महत्या केली होती. शेतकरी आत्महत्या प्रकरणी शासनाच्या वतीने मदत करण्यात येते. दोन्ही कुटुंबातील वारसांना शासनाच्या वतीने ही मदत मंजूर झाल्याने दि. १८ जुलै २०२२ रोजी मा.आ.अमिताताई चव्हाण यांच्या हस्ते आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियातील वारसांना प्रत्येकी एक लाख रुपयाचा धनादेश श्रीमती सुशिलाबाई भगवान साळवे व जळोजी ईरबाजी देलमडे यांना देण्यात आला.
अर्धापूर तहसीलदार उज्वला पांगरकर, जिल्हा सरचिटणीस संजय देशमुख, तालुकाध्यक्ष बालाजी पाटील गव्हाणे, नायब तहसीलदार मारोती जगताप, निळकंठ मदने,डॉ.विशाल लंगडे, प्रल्हादराव सोळंके, संजय लोणे, बालाजी कदम, शंकरराव ढगे, बाळु पाटील शेनीकर, राजाराम पवार, शबाना बेगम, शेख मकसुद, बाळू लोणे,मारोती स्वामी,तलाठी राजकुमार सुर्यवंशी, तलाठी माटे आदी उपस्थित होते.