अतिवृष्टीच्या नुकसानीचे इमाने इतबारे पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय द्या - मा.आ.नागेश पाटील आष्टीकर -NNL

नदीकाठावरील शेतकरी गावकऱ्यांनी संभाव्य पुराबद्दल दक्षता घ्यावी; प्रशासनाने पुरामुळे धोकादायक स्थिती निर्माण होऊ नये साठी विशेष उपाययोजना कराव्यात


हिमायतनगर,अनिल मादसवार| अतिवृष्टीच्या पावसाने कहर केल्यामुळे पैनगंगा नदीला महापूर आला होता. नदी भरून वाहत असल्याने हदगाव -हिमायतनगर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाच्या पुराला जाण्यासाठी मार्ग नसल्याने सर्वच शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून पिके नासून गेली आहेत. या पुरामुळे हजारो हेक्टर जमिनीतील पिकांचे नं भूतो न भविष्यती असे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचे  तात्काळ सर्वे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा सर्वे करताना संबंधित तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी इमान कायम घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि आता इसापूर धरण ७५ टक्के भरले आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी पाणी सोडले जाऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी तसेच आगामी काळात पुराचा संभाव्य धोक्याबाबत प्रशासनाने विशेष उपाययोजना कराव्यात अशी प्रतिक्रिया हदगाव- हिमायतनगर तालुक्याचे माजी आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली. 


मागील १० दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे हदगाव - हिमायतनगर विधानसभा मतदार संघात नदी नाल्याच्या काठावर असलेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांच्या प्रचंड नुकसान झाले आहे. विदर्भ - मराठवाड्याला लागून असलेल्या पैनगंगा नदी, कयाधू नदी, लाखाडी नदीचे पाणी आल्याने नदीला महापूर आला होता. त्यामुळे नदीकाठावरील कामारी, दिघी, टेम्भूर्णी, घारापुर, रेणापूर, डोल्हारी, हिमायतनगर, कोठा, सिरंजनी, एकंबा, पळसपूर, सिरपल्ली, शेलोडा, कोठा तांडा, कोठा ज, बोरगडी तांडा - ०१ व तांडा - ०२, विरसनी, दिघी, वडगाव ज, सिबदरा, मंगरूळ, धानोरा, वारंगटाकळी, सवना, सरसम, आंदेगाव, पोटा बु, कार्ला पी, पवना, सरसम, पोटा, यासह अनेक गावात नदी व नाल्याचे पाणी शिरले तसेच शेतकऱ्यांचा जमिनी कोवळ्या पिकासह खरडून गेल्या असून, अतिवृष्टीने शेतातील पिके व शेतजमिन मोठ्या प्रमाणात बाधित झाली आहे. हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावाचे शेतीचे व घरांचे मोठ्या प्रमाणात पडझड होऊन नुकसान झाले आहे. अनेक घरांच्या भिंती जमनीदोस्त झाल्याने शेतक-यांचे अन्नधान्य, रासायनिक खते, ग्रह उपयोगी साहित्य पुराच्या पाण्यात वाहुन गेले तर काहींचे भिजून नुकसानीत आले आहे. 


असे असताना देखील स्थानिक महसूल प्रशासन पंचनामे करण्यात कसूर करत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराबाबत या भागातील शेतकरी, नागरीकातून नाराजी व्यक्त होत आहे. हि बाब लक्षात घेता दि.१८ रोजी हदगाव - हिमायतनगर तालुक्याचे माजी आ. नागेश पाटील आष्टीकर यांनी एकंबा, कोठा, कोठा तांडा, शेलोडा, सिरपल्ली, सिरंजनी सह परिसरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी महसूलच्या अधिकाऱ्यानी स्थळ पंचनामे करून शेतक-यांना हेक्टरी ५० हजार रूपयांची नुकसान भरपाई द्यायला हवी असे मत मांडले. त्यामुळे महसूलच्या तलाठ्यांनी केवळ दिखाव्यापुरता सर्वे नं करता प्रत्यक्ष जायमोक्यावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱयांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे. जेणे करून शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीप्रमाणे शासनाची मदत मिळायला मदत होईल. यामध्ये एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहिला नाही पाहिजे याची काळजी प्रशासनाने घ्यायला हवी असेही अनेक सरपंच, शेतकऱ्यांनी सुचविले. यावेळी मा.आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी संबंधित महसूल अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून सूचना देऊन तातडीने सर्वे करून शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी तत्परता दाखवावी असे सुचविले. शंकर पाटील, सुभाष शिल्लेवाड, विशाल राठोड, संजय काईतवाड, विठ्ठल ठाकरे, विलास वानखेडे, गौतम दवणे, संतोष राठोड, संजय करपे, कृष्णा राठोड, राजू पाटील कदम, काशिनाथ पाटील, गणेशराव कोरडे, अवधूत पवार, दत्ता कोकेवाड, प्रभू कल्याणकर, काशिनाथ पाटील, अरविंद पाटील, प्रकाश हंपोलकर, गजानन चायल, सावन डाके, गजानन मनमंदे आदींसह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.    


हळूहळू पूर ओसरत असंला तरी अनेक शेतीत व गावामध्ये चिखलसदृश्य परिस्थिती दिसत असून, यामुळे शेतात सर्वंतर सोयाबीन व कापूस आडवा झालेला आहे. बहुतांश शेतकऱ्याच्या जमीन खरडलेली दिसत असून, उभी असलेली पिके उन्मळू लागल्याचे भयावह चित्र दिसत आहे. तसेच पिण्याचे पाणी दुषीत झाले असून, यामुळे परिसरात साथीचे आजार उद्भवण्याची भीती निर्माण झाली आहे. हि बाब लक्षात घेता तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठ्यासह ग्रामसेवकांनी आपापल्या हद्दीतील नागरिकांना अतिवृष्टी नंतर साथीचा आजाराची लागण होणार नाही याकडे लक्ष देणे आणि तात्काळ सर्वे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे गरजेचे असल्याचे मत शिवसेनेचे हिमायतनगर तालुका संघटक संजय कातवाड यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना व्यक्त केले. 

वाढोण्याचे ग्रामदैवत श्री परमेश्वराचं मा.आ.नागेश पाटील आष्टीकरानीं घेतलं दर्शन; शेतकऱ्यांना नुकसानीतून सावरण्याची शक्ती देण्याची केली कामना  


हिमायतनगर तालुक्यातील पुरस्थितीच्या पाहणीसाठी आले असता माजी आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी प्रथमता हिमायतनगरचे ग्रामदेवता श्री परमेश्वराचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना नुकसानीतून सावरण्याची शक्ती दे... सर्वाना सुखी सम्रुद्धी ठेव असे साकडे परमेश्वराला घातले. त्यानंतर तालुक्यातील विविध गावं भेटी देऊन पुरामुळे शेती पिकाचे, घरांचे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली आणि प्रशासनाला याबाबत तातडीने उपाययोजना करून लवकरात लवकर सर्वेचे काम पूर्ण करत शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या सूचना केल्या.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी