उस्माननगर, माणिक भिसे। यावर्षी प्रथमच चंदनझिरा ( जालना) येथील ग्रामस्थांनी ह. भ. प. डॉ. गुरुवर्य भगवानबाबा आनंदगडकर यांच्या आशिर्वादाने श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री दत्तधाम साधक आश्रम, अहिल्यापुल टेंबूर्णी रोड येथे मंगळवारी दि. १९ जुलै ते २६ जुलै दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद्भागवत कथा आयोजित करण्यात आली आहे. या सप्ताहास सुरुवात केली आहे.
या सप्ताह मध्ये सकाळी ४ ते ७ काकडा भजन, ७ ते १० श्री ज्ञानेश्वरी पारायण, १० ते ११ गाथा भजन, ११ ते १ भोजन. दुपारी १ ते पाच यावेळेत श्रीमद्भागवत कथा, सायंकाळी ५ ते ७ हरिपाठ, ७ ते ९ हरिकीर्तन, ९ ते ११ भोजन असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात नामवंत किर्तनकार म्हणून ह भ प शिवाजी महाराज ढवळे, ह भ प पांडुरंग महाराज वाघमारे, ह भ प हरिभाऊ महाराज डोंगरे, ह भ प. शालिकराम महाराज देशमुख, ह भ प. बळिराम महाराज भूतेकर, ह भ प बबन महाराज गोडबोले, ह भ प एकनाथ महाराज काळे या किर्तनकार यांचे हरिकीर्तन होणार आहेत.
या हरिनाम सप्ताह निमित्ताने सखाराम मसूजी ढोके, गोपिनाथ शिंदे, शिवनाथ राऊत, दिलीप कुलकर्णी, बबन थोरात,सुधाकर इंगळे, मधुकर बरसाले. शिवाजी बरसाले, श्रीमंत धांडे, मुक्ताबाई, शंकर घनवटे, लक्ष्मण खोकले, बालासाहेब बरसाले या भक्तांच्या वतीने दुपारी व रात्रीच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
मंगळवारी दि. २६ रोजी ह भ प डॉ. भगवानबाबा आनंदगडकर यांचे सकाळी ९ ते ११ यावेळेत काल्याचे किर्तन होणार आहे. आत्माराम अंबादास चव्हाण व वसंत भट यांच्या वतीने महाप्रसाद चे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात मृदंगाचार्य म्हणून बबनराव गोडबोले, पांडुरंग वाघमारे, एकनाथ काळे, त्र्यंबकराव घोलप, रामकिशन महाराज, किशन लष्कर, तर गायनाचार्य म्हणून ह भ प रावसाहेब दादा घाटे, माऊली बरसाले हे सेवा देणार आहेत.
प्रवचनकार म्हणून ह भ प प्रल्हाद धांगड महाराज, तर श्रीमद्भागवत कथा संगीत साठी साथ रावसाहेब घाटे, त्र्यंबक घोलप रामकिशन घोलप यांची असणार आहे. चंदनझिरा व आनंदगड येथील भजनी मंडळी या सप्ताहात नेतृत्व करीत असून या श्री क्षेत्र पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या या अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचा लाभ भाविकांनी घेण्याचे आवाहन गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.