लोहा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीतील गाळ ३०वर्षा नंतर काढला; मुख्याधिकारी पेंटे यांची माहिती -NNL


लोहा।
लोहा शहर व सहा गावे संयुक्त पाणी पुरवठा योजना गोदावरी नदीवरून  राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री डॉ शंकरराव चव्हाण यांनी मंजूर केली होती .त्या काळात  शनिदेव मंदिर माळावर पाण्याची टाकी बांधण्यात आली होती.याच पाणी टाकीतून शहराला पाणी पुरवठा होतो.पण टाकी बांधली तेव्हा पासून( १९९०) एकदाही या टाकीतून गाळ पूर्णतः उपसला नव्हता .मुख्याधिकारी डॉ गंगाधर पेंटे यांनी या टाकीतील गाळ क्रेनच्या साह्याने उपसा केला आहे.३०वर्षात पहिल्यांदाच ही टाकी गाळमुक्त होत आहे.

लोहा शहरासाठी पाणी पुरवठा योजना १९८८मध्ये पेनूर येथील गोदावरी नदीवरून करण्यात आली तत्कालीन मुख्यमंत्री डॉ शंकरराव चव्हाण यांनी ही योजना मंजूर केली होती.पाहिले नगराध्यक्ष माणिकराव पाटील पवार व तेव्हाचे उपनगराध्यक्ष कल्याणराव सूर्यवंशी, माजी सभापती व्यंकटराव मुकदम , माजी सभापती विठ्ठलराव पवार यांच्या पुढाकाराने ही योजना मंजूर झाली होती.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी ही योजना केली पण पुढे ती अयशस्वी ठरली .पण त्याच काळात शनी मंदिर ( ब्राह्मचारीचा माळ) मागील माळावर पाण्याची टाकी बांधण्यात आली .इंजि. अशोक पाटील रायवाडीकर याच्या  आरंभीच्या काळात हे बांधकाम पूर्ण झाले .

या टाकीत सुनेगाव तलावातून पाणी पडते नंतर ते फिल्टर (जेमतेम फिल्टर) होते व शहराला पुरवठा केला जातो पूर्वी ग्रामपंचायत ची जुनी पाणीपुरवठा पाईप लाईन होती .त्यात जुन्या लोह्यात  तर ही पाईप लाईन नव्हती .पण २०१२ मध्ये  जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शहरातील पाईपलाईन मंजूर केली.माजी नगराध्यक्ष व भाजपचे शहराध्यक्ष किरण वटटमवार व माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल यांच्या काळात शहरातील शहराच्या सर्वच भागात म्हणजे जवळपास ३० किलोमीटर परिसरात वाढीव वस्तीसाह त्यावेळी पाईप लाईन करण्यात आली.
  
मुख्याधिकारी ऍड पेंटे यांनी आधी पाणी फिल्टर स्वछता मोहितम राबविली ( फिल्टर जेमतेम  क्षमतेचे आहे)  त्यानंतर ३०वर्षा पासून या पाण्याच्या टाकीत जो गाळ जमा झाला होता गाळाचे थर तयार झाले होते त्यामुळे टाकी भरली तरी त्यात क्षमते पेक्षा कमी पाणी साठा व्हायचा त्यामुळे पाणी पुरवठा अभियंता चौडेकर यांनी मुख्याधिकारी ऍड गंगाधर पेंटे यांना या पाणीपुरवठा टाकीतील गाळ काढण्या बाबत माहिती दिली. 

आणि मुख्याधिकारी ऍड  पेंटे  यांनी गेल्या चार दिवसा पासून क्रेनच्या साहयाने पाणीपुरवठा टाकीतील गाळ काढण्याची मोहीम हाती घेतली.  चार दिवसा पासून आठ मजूर क्रेनच्या मदतीने गाळ काढीत आहेत.३०वर्षात  पहिल्यांदाच क्रेने गाळ उपसा केला जात आहे .त्यामुळे जास्तीचे पाणी स्टोरेज होईल शिवाय गाळयुक्त व गढूळ पाणी , दुर्गंधी पाणी आता येणार नाही आणि पाण्याचा वासही येणार नाही असा दावा यावेळी करण्यात आला.

शहरात गेल्या अकरा दिवसा पासून नळाला पाणी आले नाही. त्यामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागात नागरिकांना निर्जळीला सामोरे जावे लागत आहे.सदरील वृत्त लिहिपर्यंत पाणी पुरवठा सुरू झाला असेल.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी