नांदेड - पुणे दैनिक एक्सप्रेसला रावसाहेब दानवे दाखवणार जालना येथून हिरवा झेंडा -NNL


नांदेड।
 राज्यमंत्री रेल्वे, कोळसा आणि खाण, भारत सरकारचे रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते दिनांक  04 जुलै 2022 रोजी सायंकाळी 16:00 वाजता जालना रेल्वे स्थानकावर जालना जिल्हातील आदरणीय जन प्रतिनिधी आणि जनतेच्या उपस्थितीत रेल्वे क्रमांक 17630 हजूर साहिब  नांदेड - पुणे दैनिक एक्सप्रेस विशेष गाडीला हिरवा झेंडा दाखवऊन उद्घाटन करतील.  या कार्यक्रमात जालना जिल्हातील आदरणीय जन प्रतिनिधी आणि नांदेड विभागातील वरिष्ठ रेल्वे अधिकारी उपस्थित राहतील.

मराठवाडा विभागाचा पुणे शहराशी संपर्क वाढवण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने गाडी  क्रमांक12730/12729 द्वीसाप्ताहिक एक्स्प्रेस ची वारंवारता वाढवून दैनंदिन करण्याचा निर्णय घेतला आहे.  महत्त्वाची बाब म्हणजेही  गाडी  हडपसर ऐवजी थेट पुण्याला पोहोचणार आहे तसेच पुण्याहून सुटणार आहेज्यामुळे रेल्वे प्रवाशांना या महत्त्वाच्या शहरात जाणे सोयीचे  होईल. ही ट्रेन लोकांच्या गरजेनुसार संध्याकाळ/रात्रीच्या प्रवासाची सोय करेल जेणेकरून ते सकाळी लवकर पुणे स्टेशनवर पोहोचतील.

दिनांक 5 जुलै, 2022 पासून नांदेड-पुणे-नांदेड हि दैनंदिन रेल्वे सेवा सुरु होणार आहे.   -   दिनांक 5 जुलै पासून हि रेल्वे सेवा नवीन क्रमांकाने सुरु होईल. या गाडीचा   12730/12729 हा क्रमांक बदलून 17630/17629 असा करण्यात आला आहे.

विशेष ट्रेन क्रमांक 07630 जालना - पुणे च्या उद्घाटनाचा तपशील खाली दिला आहे :

स्थानके

गाडी क्रमांक 07630 जालना-पुणे उद्घाटन विशेष

 

आगमन

प्रस्थान

जालना

----

16.00

औरंगाबाद

17.05

17.10

मनमाड

20.10

20.15

कोपरगाव

21.05

21.07

बेलापूर

22.15

22.17

अहमेदनगर

23.02

23.05

दौंड कोर्ड लाईन

01.13

01.15

पुणे

03.30

--

 

या एकमार्गी विशेष ट्रेनमध्ये एक फर्स्ट क्लास एसीएक एसी टू टियरचार एसी थ्री  टियरपाच स्लीपर क्लासदोन जनरल सेकंड क्लास आणि दोन लगेज कम ब्रेक व्हॅन कोच असतील.

05 जुलै, 2022 पासून लागू होणार्‍या नियमित ट्रेन सेवेचे तपशील आणि त्यांच्या स्टेशननिहाय वेळा खालीलप्रमाणे आहेत:


गाडी क्रमांक  17630
हजूर साहिब नांदेड-पुणे एक्स्प्रेस

स्थानक

आगमन/प्रस्थान

हजूर साहिब नांदेड

--/15.15

पूर्णा

15.45/15.55

परभणी

16.28/16.30

सेलू

17.09/17.10

परतूर

17.34/17.35

जालना

19.03/19.05

औरंगाबाद

20.20/20.25

मनमाड

22.40/22.45

कोपरगाव

00.00/00.02

बेलापूर

00.55/00.57

अहेमद नगर

02.10/02.13

दौंड कोर्ड लाईन

03.43/03.45

पुणे

05.30

गाडी क्रमांक  17629
पुणे - हजूर साहिब नांदेडएक्स्प्रेस

स्थानक

आगमन/प्रस्थान

पुणे

--/21.35

दौंड कोर्ड लाईन

22.33/22.35

अहेमद नगर

00.00/00.03

बेलापूर

01.00/01.02

कोपरगाव

01.53/01.55

मनमाड

03.05/03.10

औरंगाबाद

05.05/05.10

जालना

05.58/ 06.00

परतूर

06.39/06.40

सेलू

06.59/07.00

परभणी

07.43/07.45

पूर्णा

08.50/09.00

हजूर साहिब नांदेड

10.20

 

या गाड्यांमध्ये एक फर्स्ट एसीएक एसी टू  टियरचार एसी थ्री टियरपाच स्लीपर क्लासदोन जनरल सेकंड क्लासएक सेकंड क्लास लगेज कम ब्रेक व्हॅन कोच आणि एक पॉवर कार मिळून एकूण 15 डबे असतील.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी