नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संचालक पदी लातूर येथील सुशीलादेवी देशमुख वरिष्ठ महाविद्यालयातील प्रा. डॉ. मल्लिकार्जुन करजगी यांची निवड विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी केली आहे. ते दि.१५ जुलै रोजी त्यांच्या विभागात रुजू झाले आहे. त्यांनी प्र-संचालक प्रा. डॉ. अर्जुन भोसले यांच्याकडून कार्यभार स्वीकारला आहे.
डॉ.करजगी हे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक आहेत. लातूर येथील सुशीलादेवी वरिष्ठ महाविद्यालयमध्ये ते इंग्रजीविभागाचे प्रमुख आहेत. गेल्या २४ वर्षापासून ते ज्ञानदानाचे कार्य करत आहेत.समाजशास्त्र हे त्यांचे अभ्यास क्षेत्र आहे.या पूर्वी त्यांनी जिल्हा आणि महाविद्यालयीन स्तरावर राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सक्रीय सहभाग घेतला आहे. त्यामुळे आता त्यांना विद्यापीठ स्तरावर काम करण्याची संधी मिळाली आहे. अशा भावना त्यांनी रुजू होते वेळी व्यक्त केल्या.
या त्यांच्या निवडीमुळे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र- कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एल.एम. वाघमारे, वित्त व लेखाधिकारी आनंद बारपुते, आंतर-विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. वैजयंता पाटील, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. वसंत भोसले,मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अजय टेंगसे, प्रा. डॉ. अर्जुन भोसले, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.