किनवट, माधव सूर्यवंशी। आजादी अमृत महोत्सव निमित्त जिल्हाधिकारी विपीन इटनकर, सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकुमार पुजार, जिल्हाशल्यचिकीत्सक डाॅ. निळकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग प्रमाणपत्रासाठी आॅनलाईन नाव नोंदणी केलेल्या दिव्यांगाना, दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी व वितरण मोहीम सध्या किनवट तालुक्यात संपन्न होत आहे.
शहरातील गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे दिनांक २७ जुलै रोजी जवळपास ३३ दिव्यांगाची तपासणी करुन त्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी तेथील उपस्थित पंचायत समिती विस्तार अधिकारी अरुण तिरमणवार यांनी सांगितले की, दिनांक २ जुलै पासून दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी व वितरण सध्या किनवट तालुक्यातील सहा ही जिल्हा परिषद सर्कल मध्ये वेगवेगळ्या दिवशी चालु करण्यात आले आहे. दिनांक २ जुलै व ९ जुलै रोजी उमरी, १३ जुलै व १६ जुलै रोजी मांडवी, २० जुलै रोजी गोकुंदा, २३ जुलै रोजी बोधडी (बु), २७ जुलै व ३० जुलै रोजी जलधारा आणि ३ आॅगस्ट व ९ आॅगस्ट रोजी ईस्लापुर येथे दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी व वितरण चालू आहे तरी सर्व दिव्यांगानी याचा लाभ घ्यावा असे सांगितले.
यावेळी कार्यक्रमास गोकुंदा उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ. धुमाळे, डॉ. केंद्रे, दत्ता केंद्रे, पंचायत समिती विस्तार अधिकारी अरुण तिरमनवार, डॉ. पवार, नेत्रतज्ञ पंकज राठोड समुपदेशक विस्तार अधिकारी आरोग्य श्रीमती एस. सी. एल. चव्हाण, पंचायत समिती विस्तार अधिकारी एस. आर. शिंदे, जलधरा ग्रामसेवक मल्लेशा इराण्णा, आंमडेलू सूद्धेवाड, घुठे व तसेच संत तुकाराम निवासी दिव्यांग कर्मशाळा कर्मचारी व राजीव गांधी दिव्यांग शाळा चे कर्मचारी प्रमोद बागवाले, शेख परविन, शिवशंकर बंडे, गणपती वंटे, प्रशांत शिंदे, अरुण बनकर, अशोक ढगे, तेलंग आणि पत्रकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके उपस्थित होते.