अर्धापूर| तालुका कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी भास्कर कापसे, उपाध्यक्षपदी अनिल गीते, सरचिटणीसपदी जगन लाकडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
राजयोग बँकेट हॉल च्या सभागृहात जिल्हाध्यक्ष मधुकर मुंगल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित विशेष बैठकीस राज्य प्रतिनिधी शिवकुमार देशमुख, जिल्हा सरचिटणीस सुनील पारडे, कोषाध्यक्ष अनुप श्रीवास्तव, प्रशांत कोकाटे, संजय देशमुख, प्रभाकर सोगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी कार्याध्यक्षपदी बालाजी कांबळे, कोषाध्यक्ष पदी मुबिन शेख, सदस्य पदी एस डि घुगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडीबद्दल राज्याध्यक्ष नितीन धामणे, पूर्व जिल्हा परिषद सदस्य बबनराव बारसे, युवा नेते पप्पू पाटील कोंढेकर, जेष्ठ नेते पंडितराव लंगडे, राज्य संपर्कप्रमुख गुलाब वडजे, एस डि पारसेवार, इंदूताई राठोड, विद्या शिकारे, अर्चना कौठेकर, पल्लवी सोनवणे, ज्योती वाघमारे, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अशोक कासराळीकर, कमल दर्डा, ज्ञानेश्वर वानखेडे, रणजित गजभारे, दत्तराव थोरात, प्रभाकर लोणे आदींनी शुभेच्छा दिल्या.