उमरी/नांदेड। नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथील आर्य वैश्य समाजातील व्यापारी प्रमोद शेट्टी यांच्या घरावर रविवारी पहाटे अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला या घटनेत दोघेजण गंभीर जखमी झाले असून या प्रकरणी हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने दिनांक 18 जुलै रोज सोमवारी संपूर्ण नांदेड जिल्हाभर महासभेच्या वतीने तालुका स्तरावरील तहसील कार्यालयात व पोलीस ठाण्यात निवेदने देण्यात येणार आहेत. रविवारी पहाटेच्या सुमारास हदगाव येथील प्रमोद शेट्टी यांच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकल्याच्या घटनेचा निषेध महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने करण्यात आला आहे. संपूर्ण नांदेड जिल्ह्यात सोमवारी निवेदने देण्यात येणार असून हदगाव येथील तहसील कार्यालयात आणि पोलीस ठाण्यात महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे पदाधिकारी सकाळी 11 वाजता निवेदन देणार आहेत. दरोडेखोरांना तत्काळ अटक करण्याची मागणी आता महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने लावून धरण्यात आली आहे.
सोमवारी दिनांक 18 जुलै सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे सचिव गोविंदराव बिडवई ,कोषाध्यक्ष सुभाषराव कन्नावार ,अनिल मनाठकर, राज्य संघटन प्रमुख प्रदीप कोकडवार, राज्य प्रसिद्धीप्रमुख नरेंद्र येरावार, राज्य उपाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, नंदकुमार मडगुलवार, नांदेड ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष विजय कुंचनवार,अॅड. प्रदिप मनाठकर, प्रभाकर पत्तेवार रवींद्र बंडेवार यांच्यासह जिल्ह्यातील महासभेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
सशस्त्र दरोडा प्रकरणी हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी अद्याप दरोडेखोर अटकेत नाहीत दरोडेखोरांना तत्काळ अटक करावी अन्यथा महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.