मुखेड, रणजित जामखेडकर। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्हा अध्यक्ष मॉन्टीसिंघ जहागीरदार यांच्या हस्ते मुखेड तालुका अध्यक्ष संतोष बनसोडे यांच्या उपस्थितीत मुखेड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते गणपत बाबूराव तेलंग यांची मनसेच्या नांदेड जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आली आहे.
यावेळी मनसेचे ,शहर अध्यक्ष शेफिक भाई ,जिल्हा अध्यक्ष रवी राठोड ,जिल्हा अध्यक्ष वाहतूक सेना संतोष सुनेवाड ,मनविसे जिल्हा अध्यक्ष दीपक स्वामी ,मनविसे जिल्हा अध्यक्ष अनिकेत परदेशी ,मनविसे जिल्हा अध्यक्ष सुभाष भंडारे ,मनविसे महेश ठाकूर , यांच्या सह जिल्ह्यातील मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते . गणपत तेलंग यांची मनसेच्या नांदेड जिल्हा सचिवपदी निवड झाल्याबद्दल तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.