नांदेड। सिटी डेंटल केअर आणि हॉस्पिटल,श्रीनगर हे मराठवाड्यातील सगळ्यात अद्ययावत,भव्य दंत व मुख रुग्णालय असून येथे नेहमीच नवीन व नुकतेच पास झालेल्या डेंटिस्ट साठी ट्रैनिंग वर्कशॉप राबवले जातात. या वर्कशॉप मध्ये सामाजिक बांधिलकी जोपासत रुग्णांना माफक दरात तज्ञ डॉक्टरां मार्फत उपचार केले जातात.
या वर्कशॉप मध्ये रूट कॅनॉल वर्कशॉप, मायनर ओरल सर्जरी व अक्कलदाढ काढण्याचे वर्कशॉप, दंतरोपण करण्याचे वर्कशॉप तसेच दातांना पिन लावण्याचे वर्कशॉप तज्ञ डॉक्टरां मार्फत घेतल्या जातात. व नवनवीन तंत्रज्ञान शिकू इच्छिणाऱ्या व शिकाऊ डेंटिस्ट ना याचा नांदेड शहरात राहून शिकता येण्याची संधी व कोणत्याही मोठया शहरात जाऊन मोठया प्रमाणात खर्च करण्याची गरज उरली नाही. कारण नांदेड सिटी डेंटल केअर आणि हॉस्पिटल, श्रीनगर ने एक अद्ययावत प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला आहे असं संचालक डॉ. दत्ता मोरे पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितलं आहे.
येत्या २४ व २५ जुलै, वार रविवार व सोमवार रोजी " दातांना पिन लावण्याचे शिबीर " आयोजित केले आहे. ओठांवर पुढे आलेले दात, वेडेवाकडे असणारे दात, दातांमधील फटी, वाईट सवयीमुळे निर्माण झालेले दंतव्यंग असणाऱ्या रुग्णांनी ज्यांचे वय १३ ते ४० वयोगटातील आहे अश्या रुग्णांनी लाभ घ्यावा. सदरील शिबिरासाठी पूर्व नोंदणी आवश्यक आहे.
तरी रुग्णांनी ९०११४२५५४२ व ९०१११४४५५६ या नंबर वर किंवा "नांदेड सिटी डेंटल केअर आणि हॉस्पिटल, कर्नाटक बँकेच्या मागे,सायन्स कॉलेज रोड, विवेकनगर कॉर्नर, श्री नगर, नांदेड या पत्यावर संपर्क साधावा. पूर्व नोंदणी केलेल्याच रुग्णांना शिबीराचा लाभ घेता येईल अशी माहिती संचालक डॉ. दत्ता मोरे यांनी दिली आहे.