नांदेड| मध्य रल्वे ने कळविल्यानुसार सोलापूर विभागातील दौंड-कुर्डूवाडी सेक्शन मधील भिगवण-वाशिंबे रेल्वे स्थानका दरम्यान दुहेरी करणाचे कार्य पूर्ण करण्या करिता ट्राफिक ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे मध्य रेल्वे ने बऱ्याच रेल्वे गाड्या रद्द, अंशतः रद्द केल्या आहेत.
यात नांदेड विभागातून धावणारी नांदेड-पनवेल-नांदेड एक्स्प्रेस ला अशताः रद्द करण्यात आले आहे ते पुढील प्रमाणे –
1. गाडी संख्या 17614 नांदेड ते पवनेल एक्स्प्रेस दिनांक 04 ऑगस्ट ते 08 ऑगस्ट, 2022 दरम्यान नांदेड ते कुर्डूवाडी पर्यंतच धावेल. कुर्डूवाडी ते पनवेल दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
2. गाडी संख्या 17613 पवनेल ते नांदेड एक्स्प्रेस दिनांक 05 ऑगस्ट ते 09 ऑगस्ट, 2022 दरम्यान पनवेल ऐवजी कुर्डूवाडी येथून सुटेल आणि कुर्डूवाडी ते नांदेड अशी धावेल. पनवेल ते कुर्डूवाडी दरम्यान रद्द करण्यात आली आहे.