भोकर, अर्धापूर व कंधार येथे रस्ता सुरक्षा मार्गदर्शन शिबिर संपन्न -NNL


नांदेड|
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने भोकर तालुक्यातील सर्व शाळाचे मुख्याध्यापक /  प्राचार्य यांना रस्ता सुरक्षा अंतर्गत माहिती दिली. प्रत्येक शाळेत परिवहन समिती स्थापन करण्याबाबत सांगितले. स्कुल बस नियमावलीची  व  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने हर घर तिरंगा या उपक्रमाविषयी माहिती देण्यात आली. तसेच या उपक्रमात विदयार्थ्यानी सहभाग नोंदविण्याबाबत कळविले. या मार्गदर्शन शिबिरामध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सहा.मोटार वाहन निरिक्षक प्रविण राहाणे हे उपस्थित होते. या शिबिरात जवळपास 90 शाळेच्या मुख्याध्यापकांनी सहभाग नोंदविला होता.

अर्धापूर तालुक्यातील महात्मा बसवेश्वर विद्यालय, मीनाक्षी देशमुख मेमोरियल माध्यमिक गर्ल्स विद्यालय व जिल्हा परिषद हायस्कूल येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने सहा.मोटार वाहन निरीक्षक वैभव डूब्वेवार, स्वप्निल राजूरकर व निलेश ठाकूर यांनी नुकतेच रस्ता सुरक्षा मार्गदर्शन शिबीर घेतले. या शिबीरात मुलांना रस्त्यावरुन जात असताना कोणती खबरदारी घ्यावी याबाबत माहिती दिली. हेल्मेट,सीट बेल्ट आणि रस्ता वाहतुकीचे नियम याबद्दल मार्गदर्शन केले. 

विशेष करुन 18 वर्ष पूर्ण होण्याआधी व लायसन्स नसताना वाहन चालविल्यामुळे कोणती कार्यवाही होऊ शकते याची माहिती देण्यात आली. विविध शाळांना शालेय परिवहन समिती संदर्भात माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक  व विद्यार्थी उपस्थित होते.

कंधार तालुक्यातील मनोविकास माध्यामिक विद्यालय, प्रियदर्शनी उच्च माध्यमिक कन्या शाळा व ग्रो ॲण्ड ग्लो येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयावतीने सहा.मोटार वाहन निरीक्षक वैभव डूब्वेवार, स्वप्निल राजूरकर , निलेश ठाकूर यांनी नुकतेच रस्ता सुरक्षा मार्गदर्शन शिबीर घेतले. या शिबीरात उपस्थित मुलांना रस्त्यावरुन जात असताना कोणती खबरदारी घ्यावी. हेल्मेट,सीट बेल्ट आणि रस्ता वाहतुकीचे नियम याबद्दल मार्गदर्शन केले. 

विशेष करुन 18 वर्ष पूर्ण होण्याआधी व लायसन्स नसताना वाहन चालविल्यामुळे कोणती कार्यवाही होऊ शकते याची माहिती देण्यात आली. हर घर तिरंगा या उपक्रमामध्ये तिरंगा खरेदी करुन 15 ऑगस्ट रोजी फडकवण्याचे विद्यार्थांना आवाहन करण्यात आले. तसेच विविध शाळांना शालेय परिवहन समिती संदर्भात माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व सुमारे पाचशे  विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी