अर्धापूर, निळकंठ मदने। भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर लागलाय असून,येथे आजपर्यंत मुख्य प्रवर्तक अशोकराव चव्हाण यांचीच एकहाती सत्ता आहे. आता विरोधक या कारखान्यात विरोधकांचे एक पॅनल उतरणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
भाऊराव चव्हाण सह.साखर कारखान्याला मुद्दत वाढून मिळाली होती,आता निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून,११ जुलैला ४१ उमेदवारी अर्ज उमेदवारांनी घेतले असून मंगळवारी १३६ उमेदवारी अर्ज असे एकुण १७७ उमेदवारी अर्ज खविक्री झाले आहेत. दाखल करण्याची १५ जुलै ही शेवटची तारीख आहे. १८ जुलैला छाणणी,१३ आगस्ट ला मतदान होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण हे काम पाहत आहेत, अनेकजण उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. येथे २१ जागेसाठी निवडणूक होणार आहे. मुदखेड, अर्धापूर तालुक्यातील सभासद संचालक मंडळावर नेहमी जातात, संचालक मंडळातील काहीजण कारखान्याची गुप्त माहिती सभागृहाबाहेर देत असल्याची उघड चर्चा आहे.
अशा संचालकांना या निवडणुकीत उमेदवारी मिळणार नसल्याचे समजते, त्यामुळे अनेक नव्या सभासदांना संचालक पदाची लाॅटरी लागण्याची दाट शक्यता आहे, अनेक ईच्छुक गेल्या सप्ताहात बंगल्याच्या चकरा मारीत आहेत. तर निष्ठावंत कार्यकर्ते ग्रासरुठवरच काम करीत आहेत. विरोधक एक एका उमेदवारांची जुळवाजुळव करीत असून, इच्छुक काँग्रेस पॅनलला पहिली पसंती देत आहे. त्यामुळे ईच्छुक पते ओपन करीत नसल्याने अतिवृष्टीत दोन दिवसांत वातावरण तापले जाण्याची दाट शक्यता आहे. पहिल्या दिवशी ४१ अर्जाची खरेदी झाली असून, मंगळवारी गर्दी होती.१५ जुलैला शेवटच्या दिवशी पुर्ण चित्र स्पष्ट होईल,काॅग्रेसच्या पॅनलला प्रतिस्पर्धी पॅनल देण्याच्या उद्देशाने भाजपासह विरोधकांच्या बैठका होत आहेत, त्यामुळे तालुक्यातील सभासदांचे या निवडणूकीकडे लक्ष वेधले आहे.