अर्धापूर। गेल्या चार दिवसापासून सतत संततधार सुरु असून, शुक्रवारी अक्षरक्ष ढगफुटीसर्दश पाऊस झाला, त्यामुळे शहरातील अनेक वस्तित पाणी शिरल्याने कच्या घरांचे व शेतकऱ्यांच्या पीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, त्यामुळे तहसीलदार यांनी नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून सबंधीतांना आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी नायब तहसीलदार यांना नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने भेटून निवेदन दिले आहे.
अर्धापूर शहरासह तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे, यादरम्यान अतिवृष्टी झाली आहे,कच्चे घरांची पडझड झाली आहे, शेतातील पीकांचे नुकसान झाले आहे, त्याकरिता तालुका प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व रहीवाशांना आर्थीक मदत मिळवून देण्यासाठी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने सोमवारी नायब तहसीलदार यांना भेटून निवेदन दिले आहे, यावेळी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे,मुसव्वीर खतीब, प्रवीण देशमुख,गाजी काजी, व्यंकटी राऊत, डॉ विशाल लंगडे, सलीम कुरेशी, नामदेव सरोदे, नागरीक गौसमुल्ला, गजानन मेटकर यांनी दिले.