नांदेड। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गतउन्हाळी-२०२२पी
त्या आता १८ जुलै पासून सुरु होणार आहेत. अतिवृष्टी व पूर सदृश परिस्थितीमुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (सारथी) करिता अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रे पडताळणी व मुलाखत प्रक्रिया या १४ ते १६ जुलै दरम्यान होणार आहेत. त्यामुळे पी.एचडी कोर्स वर्क परीक्षेच्या तारखेमध्ये विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या आदेशानुसार बदल करण्यात आलेला आहे. सदर परीक्षा या आता २५,२६ व २७ जुलै दरम्यान घेण्यात येणार आहेत.
यापूर्वी निर्धारित केलेल्या परीक्षा केंद्र आणि निर्धारित वेळेतच घेण्यात येतील. याबाबतचे सुधारित परिपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येणार आहे. तरी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी आणि केंद्रप्रमुखांनी सदर तारखेत बदल झालेली बाब सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांच्या निदर्शनास आणून द्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी केले आहे.