उस्माननगर, माणिक भिसे। लोहा तालुक्यातील मौजे धनज ( बु. ) येथील शेतमजूरदार महीलेला काही महीन्यापूर्वी वन्यप्राणी रानडुक्कराने हाल्ला करून मोठ्या प्रमाणात चावा घेऊन जखमी केल्यामुळे वनविभागाच्या वतीने सदरील जखमी महीलेला वीस हजार रुपयेचे धनादेश दिले.
लोहा तालुक्यातील मौजे धनंज (बु.) येथील शेत मजुर, महिला रेणुकाबाई बाजीराव माळेगावे ही शेतात दररोज शेतात शेती काम करत आसते ,२५ /७/रोजी शेतात शेतीचे कामे करत असताना अचानक वन्य प्राणी रानडुक्कर यांने हाल्ला करून जबर चावा घेऊन जबरदस्त जखमी केले होते . सदरील घठनेची माहिती वनविभागाला देण्यात आली व जखमी महीलेला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले .
वनविभागाचे अधिकारी यांना या घटनेची माहिती समजताच कर्तव्यदक्ष वनरक्षक कर्मचारी अधिकारी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला. व जखमी महिलेच्या तब्येतीची विचारणा केली आणि शासकिय नियामाप्रमाणे मदत देण्याचे आश्वासन दिले होते.त्या आश्वसनाची तात्काळ पुर्तता वनविभाग यांनी मंजूर करून धनादेश देण्यात आला. मा.केशव वाबळे ( उपवनसंरक्षक नांदेड ) मा. वि. एन. ठाकुर साहेब ( सहायक वनसंरक्षक नांदेड ) यांच्या आदेशाने मा. संदीप शिंदे (वनपरिक्षेत्र अधिकारी नांदेड) यांच्या कडुन दि. 25/-जूलै-22) लोहा वनपरिमंडळ अधिकारी ( अ. का.)मा. एल.एन. शेळके व वनरक्षक शिराढोण तथा अतिरिक्त उस्माननगरचे नामदेव एस. पंढरे , यांच्या हस्ते वन्यप्राण्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या रेणुकाबाई बाजीराव माळेगावे यांना वनविभागाच्या वतीने वीस हजाराचा धनादेश देण्यात आला .यावेळी लोहा वनपरिमंडळ अधिकारी ( अ .का. ) मा.एल.एन. शेळके, मा.एन.एस. पंढरे (,वनरक्षक ,) तसेच गावातील प्रमुख नागरिक उपस्थित होते.