उस्माननगर। उस्माननगर ता.कंधार येथील समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उस्माननगर येथे आज दि. २९जुलै २०२२ शुक्रवार रोजी उस्मान नगर केंद्राची दुसरी शिक्षण परिषद उत्सहात संपन्न झाली .
शिक्षण परिषेदेच्या प्रारभी क्रांती जोती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पुजनाने सुरवात झाली या परिषदे च्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक गोविंद बोदेमवाड सर होते तर प्रमुख मार्गदर्शक कंधार चे गट शिक्षणाधिकारी- संजय येरमे साहेब साहेबांनी मार्गदर्शन केले. शि. वि. अधिकारी- पांडे साहेब याचे मार्गदर्शन लाभले. केंद्रप्रमुख- जयवंतराव काळे परिषदे चे प्रास्ताविक केले,या वेळी संस्थेचे कोषाध्यक्ष अनिरुद्ध सिरसाळकर प्रमुख उपस्थिती होती इयत्ता आठवी (सेमी ) विज्ञानाचा आदर्श पाठ बी बी पाटील यांनी घेतला.
सुलभक- केंद्रे सर, शिंदेसर वाघमारे सर लाठकर सर विविध विषयांवर मार्गदर्शन केले केंद्रातील नऊ शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते. संचलन सौ. गौतमी कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रर्यवेक्ष- राजीव अंबेकर मानले. परिषद यशस्वी करण्यासाठी बोगेवार सर, नवसागरे सर,डांगे सर, स्वामी सर सुरकुतलोलु सर, सोनवळे सर,वारकड सर यांनी परीश्रम घेतले. तर राम पवार, सुर्यकांत सर्यवाड, बालाजी भिसे, मारोती गोरे, कचरू मुंगल, मिनकुलवाड यांनी चहा पाणी व भोजन व्यवस्थेसाठी परिश्रम घेतले .