नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी,ग्रामसेवक व कृषीसहाय्यक शेतकऱ्यांच्या बांधावर - NNL


शिवणी,प्रकाश कार्लेवाड। 
किनवट तालुक्यातील शिवणी इस्लापुर परिसरात या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पासून  आठ ते दहा दिवस सतत च्या पावसामुळे कोवळ्या पिकांचे प्रचंड  नुकसान झाले आहे. या सोबतच रस्ते,पूल,घराच्या पडझडी व पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या मृतक जनावरांची पाहणी व पंचनामे करण्यासाठी महसूल,कृषी सह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे व पाहणी करत आहेत.*                                                      

नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर हे किनवट तालुक्यातील अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती पाहणी साठी आले असता प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले होते की,लवकरच शेती सह अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी दिले होते.या अनुषंगाने पाहणी किनवट तालुक्याचे पथक प्रमुख साहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व किनवट चे तहसीलदार डॉ.मृणाल जाधव व तालुका कृषी अधिकारी बी.बी.मुंडे,गटविकास अधिकारी धनवे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सर्व सज्जात पिकांचे पंचनामे करण्यासाठी महसूल,पंचायत समिती,कृषी सह विविध विभागाचे कर्मचारी अधिकारी बांध्यावर दिसत आहेत. 

या साठी शिवणीसह परिसरातिल अप्पारावपेठ,मलकजाम, कंचली, चिखली,दयालधानोरा,गोंडजेवली, तोंटम्बा, मारलागुंडा, गोंडेमहागाव, तल्हारी,कुपटी सह विविध परिसरातील सज्जा मधील तलाठी विश्वास फड,सुभाष आडे,एम. टी.गोदे,अविनाश करंदीकर, प्रेरणा राऊत, पेंटेवाड, ग्रामविकास अधिकारी, जि. एन.धसकनवार, अनिल बिल्ललवार,बी.व्ही. गुंडे मुधोलकर, एस.व्ही.निलेवाड,डगच्चे मॅडम,भारती,पन्नासे,सह कृषीसहायक श्रीनिवास दांडेगावकर,गोपीनाथ खुडे,आर.एस.बुलबुले, बी.डी. जाधव,एस.टी. खंदारे, व्ही.ए.पांडे, कोतवाल राजू वानोळे सह शिवणी अप्पारावपेठ परिसरातील सर्व पोलीस पाटील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य सह पत्रकार बांधव शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यसाठी शिवणी परिसरातील वाडी-तांड्यात गावातल्या शेतशिवाराच्या बांध्यावर दिसत आहेत.तर दुसरीकडे शिवणी-इस्लापुर जलधारा,अप्पारावपेठ या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेती पंचनामे करण्यासारखे नाहीत तर या वरील मंडळात ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ आर्थिक मदत द्यावे असे शेतकरी बांधवाकडून मागणी होत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी