सोलापूर| आषाढी एकादशी निमिताने यात्रेसाठी येणाऱ्या जास्तीत जास्त वारकऱ्यांना श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेता यावे यासाठी गुरुवारपासून (ता.१) आषाढ शुद्ध पौर्णिमेपर्यंत श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन २४ ताससाठी खुले करण्यात आले आहे. त्यामुळे रोज किमान एक लाख वारकऱ्यांना विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेता येणार आहे.
कोरोनानंतर दोन वर्षांनी होत असलेल्या आषाढी यात्रेसाठी यंदा विक्रमी संख्येने वारकरी पंढरपुरात येतील, अशी शक्यता आहे. त्या अनुषंगाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने वारकऱ्यांना सुविधा पुरवण्याची तयारी सुरू केली आहे. यात्रा काळात १५ दिवस देवाचे दर्शन २४ तास सुरू राहते.
एक जुलैपासून १५ जुलैपर्यंत देवाचे दर्शन २४ तास चालू राहणार आहे. पावसाची शक्यता लक्षात घेऊन दर्शन रांगेत कायमस्वरूपी ४ आणि तात्पुरती ६ असे एकूण दहा पत्राशेड उभी करण्यात आली आहेत. तसेच मंदिरावरही आकर्षक आणि लक्षवेधी अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे मंदिर रोषणाईने उजळून निघाले आहे. अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली. दर्शन रांगेत पावसाची शक्यता लक्षात घेऊन कायमस्वरूपी चार आणि तात्पुरती ६ असे एकूण १० पत्राशेड उभे करण्यात आले असल्याचेही सांगण्यात आले आहे.
कोरोनानंतर दोन वर्षांनी होत असलेल्या आषाढी यात्रेसाठी यंदा विक्रमी संख्येने वारकरी येतील, अशी शक्यता आहे. त्या अनुषंगाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने वारकऱ्यांना सुविधा पुरवण्याची तयारी सुरू केली आहे.