थेट महाविद्यालयाच्या वर्गात पहिलीच्या विद्यार्थ्यांना दिले शिक्षणाचे धडे : संचालक मंडळानी विद्यार्थ्यांचे पुष्प तर पालकांचा सत्कार करुन केले स्वागत
अर्धापूर, निळकंठ मदने| पार्डी- अर्धापूर रस्त्यावर असलेल्या शारदा भवनच्या शाळेच्या पहिल्याच दिवशी विक्रमी १०० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती, संचालक मंडळ व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ,मिठाई तर पालकांचा प्रतिनिधी स्वरुपात सत्कार करण्यात आला, विशेष पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांसह महाविद्यालयाच्या वर्गात विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्यात आले,गुणवता व शिस्त यावर संचालक मंडळाचे संपुर्ण लक्ष राहील असे सांगण्यात आले.
अर्धापूर शहरात पार्डी - अर्धापूर रस्त्यावर शंकरराव चव्हाण महाविद्यालयात महात्मा फुले शाळेच्या धर्तीवर शारदा भवनची प्राथमिक व माध्यमिक शाळा यावर्षी माजी मुख्यमंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष ना.अशोकराव चव्हाण,व उपाध्यक्षा माजी आमदार सौ अमिता अशोकराव चव्हाण यांनी यावर्षी येथे शाळा आणली,प्रारंभी विद्यार्थ्यांच्या नोंदी घेण्यात येऊन, प्रवेश प्रक्रिया झाल्यानंतर प्रत्यक्ष शुक्रवारी शाळेला प्रारंभ झाला,शाळेचा पहिला दिवस असल्याने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उदय निंबाळकर,तर प्रमुख पाहुणे कोषाध्यक्ष प्राचार्य रावसाहेब शेंदारकर, संचालक नरेंद्र चव्हाण, प्राचार्य के के पाटील, मुख्याध्यापक जाधव,काळे, नगराध्यक्ष छत्रपती कानोडे,शहराध्यक्ष राजू शेट्टे, प्रवीण देशमुख, मुसव्वीर खतीब,सचीव निळकंठ मदने, डॉ विशाल लंगडे, सोनाजी सरोदे,व्यंकटी राऊत,उमेश सरोदे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी निंबाळकर म्हणाले कि, विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी शिक्षक, संचालक मंडळ सदैव दक्ष राहून गुणवता वाढीसाठी पुर्ण लक्ष देणार असून,लवकरच स्वातंत्र्य इमारतीमध्ये ही शाळा सुरू होईल असे ते म्हणाले.
प्राचार्य शेंदारकर म्हणाले कि, विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण उच्च दर्जाचे दिल्यास विद्यार्थ्यांची बुध्दीमतेत वृध्दी होईल, तेव्हाच ही विद्यार्थि स्पर्धेत उतरतील, नरेंद्र चव्हाण म्हणाले कि,शिक्षण हेच परीवर्तनाचे,विकासाचे माध्यम असल्याने शिक्षकांनी काळजीपुर्वक ज्ञानार्जन करावे,व शाळेच्या वेळेत मोबाईल वापरु नये असे ते म्हणाले. प्रस्तावित माध्यमिकचे मु.अ.बी बी जाधव तर आभार पर्यवेक्षक डी एस काळे यांनी मानले.यावेळी गुणवत विरकर,शंकर ढगे,प्रा.मुक्तारोदीन काजी,प्राथमिकच्या मु.अ. सौ.जे सी रामर्तीथे,सौ.एस एस धुळगंडे,एस व्ही जलदावार,ए व्ही कदम,डी एच कदम,दिपक खंदारे,बी जी आवरे,डि एल खानजोडे,बालाजी धात्रक यांच्यासह आदिंची उपस्थिती होती.