स्वामी विवेकानंद हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स डे साजरा -NNL

लायन्स क्लबच्या वतीने करण्यात आला डॉक्टरांचा सन्मान !


नांदेड।
येथील अण्णाभाऊ साठे चौक परिसरातील स्वामी विवेकानंद हॉस्पिटल येथे काल एक जुलै रोजी "डॉक्टर्स डे"मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी  "डॉक्टर्स डे" निमित्त उपस्थित सर्व डॉक्टरांना त्यांच्या आरोग्य सेवेतील योगदानाबद्दल सर्वांना शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित सर्व डॉक्टर्स  बांधवांचा लायन्स क्लबच्या वतीने सत्कार व सन्मान करण्यात आला.

सन्मान सोहळ्यानिमित्त लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टरांबद्दल गौरवोदगार व्यक्त करताना ते करत असलेल्या "अनमोल सेवेचा"  छोटासा सन्मान करण्याचा हा आमचा हेतू असून यापुढेही रुग्णसेवेचे अखंडीत काम आपल्या हातून अविरतपणे होईल अशी अपेक्षा व्यक्त करत आणखी चांगल्या कामाची अपेक्षा यावेळी लायन्स क्लब च्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

डॉक्टर्स डे च्या या सन्मान सोहळ्यासाठी लायन्स क्लबचे खालील पदाधिकारी उपस्थित होते यात श्री गंगाबिशन कांकर-अध्यक्ष, श्री अवधूत क्षिरसागर - कोषाध्यक्ष, श्री नारायणदासजी कलंत्री - PDG, श्री अशोक कदम, श्री अविनाश रावळकर, श्री शिवप्रसाद टाक, श्री नागोराव सोळंकी, श्री अरुण तोष्णीवाल आदि लॉयन्स पदाधिकाऱ्यांची मुख्य उपस्थिती होती.

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून श्री ओमप्रकाश इन्नानी,श्री दिपक मोदाणी ,श्री दिपक रंगणानी,श्री रमेश सारड्रा, श्री शाम लाहोटी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजक तथा स्वामी विवेकानंद हॉस्पिटल चे संचालक सर्वश्री दिनेश धूत, डॉ आशा विभूतवार,डॉ किशन पाटील , डॉ पांडुरंग विभूतवार यांनी उपस्थित सर्व डॉक्टर बांधव तसेच लायन्स क्लब चे सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी