गंगाधर चेपूरवार यांना एम.फिल.पदवी -NNL


नांदेड।
पीपल्स कॉलेज नांदेड येथील एम.फिल.चे संशोधक विद्यार्थी गंगाधर नरसिंगराव चेपूरवार यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने मराठी विषयात एम. फिल (तत्वज्ञान पारंगत) हि पदवी प्रदान करण्यात आली असून, त्यांनी पीपल्स कॉलेज नांदेड येथील मराठी विभाग प्रमुख 

 व मार्गदर्शक प्रा.डॉ.अनंत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली -"माधव सरकुंडे यांच्या कथेचा चिकित्सक अभ्यास" (विशेष संदर्भ 'सर्वा' व 'ताडमं') या विषयावर लघूशोध प्रबंध सादर करण्यात आला असून, त्यांनी लेखी परीक्षा व मौखिक परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली असून, दिनांक 21 जुन 2022 रोजी त्यांची मौखिकी यशस्वीपणे पार पडली असून, यावेळी परीक्षक म्हणून डॉ. मथुताई सावंत ह्याची उपस्थिती होती, यावेळी एम.फिल चे संशोधक  विद्यार्थी उपस्थित होते. 

मराठी विषयात 'तत्वज्ञान पारंगत' एम.फिल. पदवी प्राप्त केल्याबद्दल गंगाधर नरसिंगराव चेपूरवार यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, या यशाचे श्रेय त्यांनी आपल्या आईवडिलांना दिले आहे, या यशाबद्दल पीपल्स कॉलेज चे प्राचार्य डॉ. आर. एम. जाधव, मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.अनंत राऊत, प्रा.डॉ. यशपाल भिंगे, प्रा.डॉ. मथुताई सावंत, प्रा.डॉ. बालाजी पोतुलवार, प्रा. कल्पना जाधव, संशोधन केंद्र समन्वयक श्री. गडपवार, ग्रंथपाल श्री. संदीप गायकवाड, श्री.गव्हारे, सय्यद इरफान, गोंविद कुटे, देविदास इंगोले, सुर्यकांत राऊत, श्रीमती झाडे, विजय सावने,व श्री.नारायण माहोरे, प्रा.राजीव राचोटकर श्री. नितीन पांढरे, रामदास आल्लडवार, डॉ. बाशेट्टी, डॉ. अभय मनसरे, डॉ.नावेद अथर आदि मान्यवरांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी